केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची प्रभा ताई शिर्के यांच्या माहेरवाशिणला सदिच्छा भेट. .!
बदलापूर-(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
आधुनिक जीवनशैलीमुळे महिलांना माहेरवाशिण होण्याचा आनंद मिळत नाही.काही महिलांची आई हयात नसते,तर माहेर खुप लांब असत,मैत्रिणींना माहेरी नेऊ शकत नाही.सर्वांनाच आपलस वाटणारे या माहेरघराची ख्याती सर्वदुर पसरली आहे.या माहेरवाशिणची संकल्पना जाणुन घेण्यासाठी नुकताच केंद्रीत पंचायत राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.कुकुंमतिलकाने ओवाळणी करुन साग्रसंगीताने त्यांचे माहेरवाशिणच्या संस्थापक संचालिका प्रभाताई शिर्के यांनी स्वागत केले.कशाप्रकारे महिलांचे माहेरपण केल जात याची सविस्तर माहिती प्रभा ताई शिर्के यांनी मंत्री महोदयांना दिली. माहेरवाशिणची सर्व संकल्पना केंद्रीय पंजायंत राज्य मंत्री कपिल पाटील यांची जाणुन घेतली.व या माहेरघराला योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रभा ताई शिर्के यांनी बनविलेल्या मोदक व करंजीचा आस्वाद घेतला.याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,माजी नगरसेवक संजय भोईर,शरद तेली,संभाजी शिंदे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.