महाळपुर ता शिंदखेडा जि धुळे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन..

महाळपुर ता शिंदखेडा जि धुळे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन…सविस्तर :- ग्रामपंचायत महाळपुर ता शिंदखेडा जि धुळे येथे धुळे जिल्हा परिषदचे महिला व बालकल्याण विभागाचे सभापती सौ संजीवनी संजय सिसोदे यांच्या शुभ हस्ते व गावाचे प्रथम नागरिक सरपंच अलकाबाई विश्राम निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.सरपंच अलकाबाई निकम व संदिप निकम यांच्या मागील 3 महिन्यात केलेल्या सततच्या पाठपुरावा व अथक परिश्रमाने एकूण 9 विकास कामे मंजूर झाली असून त्यात गावांतील मारुती मंदिर सुशोभीकरण करणे , गावात अमरधाम बांधणे, गावालगत असलेल्या मातीनाला मध्ये पाईपलाईनद्वारे पाणी टाकणे , आदिवासी महिला साठी शौचालय बांधकाम करणे , आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक बसवणे व पाईप लाईन करणे , जिल्हा परिषद मराठी शाळेत संरक्षण भिंत बांधकाम करणे , पाणंद रस्ते तयार करणे , दलित वस्तीत पथदिवे बसविणे आदी कामाचे धुमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आले आहे. भूमिपूजन वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गावातील उत्कर्षा दिलीप महाळपुरकर व भार्गवी पंकज निकम या दोघी मुलींनी महिला व बालकल्याण सभापती व गावकऱ्यासमोर अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी एक वर्ग शिक्षक, एक वर्ग खोली मिळावी , तसेच शाळेतील ग्राउंड व्यवस्थित करून मुल मुली यांना खेळण्यासाठी खेळणी आमच्या शाळेत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली त्यावेळी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते.त्यानंतर गावातील तरुण तरफदार भावी नेतृत्व संदिप भाऊ निकम यांनी गावातील विकास कामासाठी आमच्या परिवाराने काय कसे मेहनत घेतली याविषयी सविस्तर माहिती दिली गावात कोणीही वैयक्तिक लाभापासून वंचित राहणार नाही , घरकुल योजने किती लोकांना लाभ मिळेल जो कोणी वंचित राहील त्याकामी देखील लाभ मिळण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल तसेच या भाषणात त्यांनी गावातील माझे जे कोणी विरोधात असतील ते देखील कुठल्याही प्रकारे योजनेपासून वंचित राहणार नाही, कोणाही विषय दुराग्रह न ठेवता सर्वांना लाभ मिळावा यासाठी विशेष पर्यंत केले जातील असे तसेच गावाच्या विकासासाठी आमचा परिवार सदैव तत्पर असल्याचे व आमच्या गावासाठी अजून काही विकास कामे द्यावीत असे देखील त्यांनी भाष्य केले आहे. गावातील पांडुरंग वाघ यांनी देखील महाळपुर गावावर तसेच परिसरावर संजीवनी ताई नेहमीच प्रेम राहिले त्यांनी यापूर्वी देखील गावात अनेक कामे दिलेली असून ते सर्वांना ठाऊक असल्याचे सांगितले सर्वात शेवटी सौ संजीवन सिसोदे यांनी संबोधित करून आपले गाव एक मंदिर आहे. गावातील वारकरी संप्रदाय असल्याने आपले गाव नेहमी अग्रेसर राहिले आहे.गावातील चिमुकल्या मुलींनी केलेली मागणी देखील लवकरच मार्गस्थ करू असे आश्वासन दिले आहे यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष सरपंच अलकाबाई विश्राम निकम , माझी उपसरपंच जितेंद्र निकम , दत्रातय निकम , अन्य सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!