मुक्त पत्रकारिता प्रशिक्षण शिबीराचे शानदार आयोजन

मुक्त पत्रकारिता प्रशिक्षण शिबीराचे शानदार आयोजन !!
मुंबई – प्रतिनिधी
रविवार दिनांक ११जून 2023 रोजी दादर येथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ आयोजित मुक्त पत्रकारिता प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्या नंतर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय चे प्रमुख कार्यवाह मा. श्री रविंद्र गावडे साहेबांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री पाटकर साहेबांनी प्रस्तावना सादर केली. माजी महापौर मा श्री महादेव देवळे यांनी आपल्या भाषणात, पत्रकारांचे कौतुक केले. आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय चे प्रमुख कार्यवाह मा श्री रविंद्र गावडे यांनी मार्गदर्शन पर पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसत्ता चे पत्रकार श्री आत्माराम नाटेकर यांनी शुद्ध लेखन वर खुप छान माहिती दिली आहे. श्री दिनकर गांगल यांनी पत्रकारिता कालची आणि आजची या विषयावर २००वर्षापासून चा इतिहास सांगितला. प्रा. संतोष सावंत यांनी वाढती गुन्हेगारी आणि पत्रकारांचे कर्तव्य या विषयावर खुप छान पद्धतीने अनुभवी माहिती दिली. आणि त्यांनी प्रश्नांची उत्तरे ही दिली.
दुसऱ्या सत्रात, दै. प्रहार वृत्तपत्राचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी सांगितले की, पूर्वीचे पत्रकारांनी लेखणीतून जनजागृती करुन, देश स्वतंत्र करण्यास मदत झाली आहे. आणि खांडेकर यांनी ही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिली. उपस्थित कविवर्य देवळेकर यांनी ह्या कार्यक्रमाची कविता सादर केली आहे. प्रा. हेमंत सामंत यांनी, आपल्या पत्रकार रुपातील अनुभव सांगितले. मुंबई चे माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आले. आणि त्यांनी आपल्या भाषणात, आयोजकांचे कौतुक केले. भावी पत्रकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.
आणि ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मिनाक्षी डोंगरे यांनी केले. सकाळचा नाश्ता- दुपारचे भोजन आणि सायंकाळचा चहा चे उत्तम नियोजन आयोजकांनी केले आहे. शब्दश्री विलास देवळेकर यांनी दिवसभराच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर कविता गाऊन उपस्थितांची मने जिंकली.तसेच सर्व उपस्थितांचे मा. पंढरीनाथ तामोरे यांनी आभार मानत, राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!