विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ तालुका शहादा जिल्हा नंदुरबार .
आज दिनांक 15 जून 2023 शैक्षणिक वर्ष 2023/24 चा शाळा सुरू होण्याच्या पहिला दिवस . या पहिल्या दिवशी विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथील शाळकरी चिमुकल्या मुलांची जय्यत स्वागत करण्यात आले .लहान मुलांचे शाळेचे प्रिन्सिपल श्री एम के गवळे सर व सर्व शिक्षिका यांच्यामार्फत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . अनोख्या खेळाच्या माध्यमातून मुलांचे नाट्यमय रूपात स्वागत झाले . हा आगळा वेगळा प्रकार पाहून मुले ही खुश झाली .
याप्रसंगी संस्थेचे संचालक आप्पासाहेब श्री प्रकाश पाटील , माजी संचालक दाजी साहेब श्री दत्तू नथू पाटील व नानासाहेब श्री विठ्ठल नथू पाटील उपस्थित होते .मान्यवरांच्या हस्ते या मुलांना बिस्किट पुडा देऊन गोड स्वागत करण्यात आले . आणि दिवस भर गंमत जमत करून मुलांचा पहिला दिवस पार पडला .