राष्ट्रीय कार्यकर्तृत्व सन्मान महोत्सव संपन्न
टी.एम.जी क्रीयेशन्स व एम.व्ही.एस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यकर्तुत्व सन्मान महोत्सव नुकताच साहित्य मंदीर, वाशी येथे मोठ्या थाटात पार पडला. एन. डी. खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सदर राष्ट्रीय महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रतीं ना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सन्मान महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन करून, राष्ट्रगीताने झाली. महोत्सवाचे उदघाटन भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी केले. याप्रसंगी कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख , प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित, बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले, कुटुंब रंगलंय काव्यात फेम विसूभाऊ बापट, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप, लिज्जत पापडचे सुरेश कोते, समाजसेविका अँड संगीता रोकडे, सिने अभिनेत्री सिध्दी कामथ, अभिनेते तथा दिग्दर्शक महेश्वर तेटाबे, टि. व्ही. सिरीयल अभिनेत्री पल्लवी सोनाने आणि महोत्सावाच्या संयोजिका सौ. सलमा खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरहु सोहळ्याचे प्रास्ताविक एम.व्ही.एस. चे संस्थापक एन. डी. खान यांनी केले. पुरस्कार सोहळ्याचे उत्तम निवेदन सौ. गौरी देशपांडे यांनी केले.
यावेळी टी.एम.जी. क्रीयेशन्स च्या वतीने ‘सुरीली लम्हे’ हा संगीतमय कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. यामध्ये विद्या तन्वर, विजय मोरे,जावेद शेख, विजय भिंगे, जयश्री वाघ आणि सुधींद्रा. यांनी एका पेक्षा एक सरस गाणी सादर करून, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर संगीतकार गिरीश पंचवडकर, श्रीनिवास गडकरी, शब्दश्री विलास देवळेकर, शाहीर दत्ताराम म्हात्रे व जनार्दन पाटील यांनी उपस्थितांसमोर आपल्या रचना सादर केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्या तन्वर यांनी उत्कृष्टपणे केले. उपस्थित मान्यवरांनी सर्व पुरस्कारार्थीचे कौतुक करून, त्यांच्याबद्दल गौरवपूर्ण उदगार काढले. आभार प्रदर्शन राजकुमार ताकमोगे यांनी केले.
सदरहू भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी स्नेहा चांदोरकर, डॉ.स्मिता सहस्रबुद्धे, ईसा शेख, विजय भोसले, मुश्ताक हाश्मी, राजकुमार ताकमोगे, रमेश चव्हाण, मीना ताकमोगे, विलास देवळेकर आणि लिटिल कीडस स्कूलचे शिक्षक इत्यादी नी परिश्रम घेतले.
कवी विलास देवळेकर यांनी पुरस्कार सोहळ्यावर आधारित केलेली कवितेचा फ्लेक्स कार्यक्रमाच्या ठिकाणी झळकत होते.