धरमपाल फौजदार चॅरिटेबल ट्रस्ट कडुन अपंग कुशल भानुशाली यास व्हीलचेअर भेट. .. !
मुंबई (गुरुनाथ तिरपणकर)
महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष,समाजसेवक यांनी कुशल सचिन भानुशाली या अपंग मुलास तेजोमय आयुष्य जगण्यासाठी धरमपाल फौजदार चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने प्राप्त झालेली व्हील चेअर नुकताच जेष्ठ पत्रकार,साहित्यिक राजा मयेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.या कार्यक्रम लोअर परेल येथील फिनिक्स माॅल येथील आवारात मोठ्या थाटामाटात पार पडला.प्रकाश पाटकर यांच्या नावातच तेजोमय प्रकाश आहे.त्यांनी आतापर्यंत अनेक असहाय्य गरजूंना अंधारातुन प्रकाशाकडे नेण्याचे काम केले आहे.काही वर्षांपूर्वी प्रकाश पाटकर यांनी कुशल या अपंग मुलास ऑपरेशनसाठीही लाख मोलाची मदत केली होती.परमेश्वर प्रकाश पाटकर यांना उदंड आयुष्य देवो,अशी भावना भानुशाली कुटुंबियांनी व्यक्त केली.जेणेकरून कुशल सारख्या अनेक असहाय्य गरजूंना तेजोमय आयुष्य जगता येईल.यावेळी कुशलची आई विणा सचिन भानुशाली,भाऊ मिहीर भानुशाली,नागेश नाईक आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती हजर होत्या.