गणू महाराज यांना राज्यस्तरीय बळिराजा आत्मसन्मान पुरस्कार प्रधान: नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गणू महाराज यांना राज्यस्तरीय बळिराजा आत्मसन्मान पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माजी आयजी प्रतापराव दिगावकर साहेब प्रेणीत बळीराजा आत्मसन्मान सेवा संघ या संस्थे मार्फत राज्यस्तरीय बळिराजा आत्मसन्मान पुरस्कार 2023 आपले लाडके दिपक रत्नाकर दिक्षित ( गणू महाराज) यांना सिनेअभिनेत्री सायली पाटील,प्रतापराव दिगावकर माजी आयजी,कारगिल योद्धा नायक दिपचंद राठोड हरियाणा,जुगाडू कमलेश,शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा सटाणा,आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महाराजांचे खूप खूप अभिनंदन
या कार्यक्रमाप्रसंगी म्हसदी तसेच पंचक्रोशीतील गणू महाराजांवर प्रेम करणारी मंडळीन कडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे व अभिनंदन केले.तसेच
यावेळी राजेंद्र देवरे,उमाकांत देशपांडे,प्रकाश देवरे,जगदीश देवरे,विजय अहिरे, युसुफ पिंजारी,प्रमोद निकम राजे संभाजी भजनी मंडळाचे,रामराव ह्याळीस, अशोक देवरे, गुलाब खैरनार,रामा दादा,दीपक देवरे,किशोर देवरे,समाधान देवरे,गोलू देवरे,पंकज जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.