विद्युत खांबावरील खाजगी टी.व्ही. केबल्स, इंटरनेट केबल्स काढण्यात यावे- मनसे
शहादा- शहरातील विद्युत खांबावर टाकण्यात आलेल्या खाजगी टी.व्ही. केबल्स, इंटरनेट केबल्स काढण्यात यावे या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता विलास बागुल याना निवेदन दिले.
निवेदनाची आशय असा की, शहरातील महावितरण कार्यालायाच्या लगतच असलेला जुना प्रकाशा रोडवरील विद्युत खांबावर विद्युत तारांव्यतिरिक्त इतरही केबल्स टाकल्या असून त्यापैकी काही केबल्स ह्या तुटून वाऱ्यासह डोलताना दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपैकी असणाऱ्या आशा रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यास जीव मुठीत धरून वाहन –मोटारसायकल काढावी लागत असल्याचे हे रोजचे झाले आहे. रस्त्यावरच लोंबकळत असणाऱ्या ह्या केबल्स अगदी महावितरण कार्यालायाच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ असले तरी महावितरणचे कर्मचारी-अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची तर वाट बघत नाही ना? शहराच्या जवळपास सर्वच खांबावर खाजगी टी.व्ही. केबल्स, खाजगी इंटरनेट केबल्सचे जाळे झाले आहेत. चौका-चौकातील, मुख्याबाजार, मुख्य रस्ते इत्यादी ठिकाणच्या खांबावर असे केबल्स लोंबकळत असल्यास महावितरण वतीने एकही कारवाई होत नसल्याने हि चिंतेची बाब आहे. तरी आपणास विनंती की विद्युत खांबावरील इतर खाजगी केबल्स ह्या काढण्यात यावे, ज्यांनी अवैधरीत्या केबल्स टाकल्या आहेत त्यांचावर देखील कारवाई करण्यात यावी अशी विंनती. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा निवेदनातून इशारा देण्यात आला. निवेदनावर मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, शहादा तालुका उपाध्यक्ष दीपक लोहार आदींच्या स्वाक्षरी आहे.