*नेर:* *जय भद्रा बहुउद्देशी संस्था प्रतापपूर येथे वंचित मुलांच्या वस्तीगृहात शालेय साहित्य वाटप* *नेर:* साक्री तालुक्यातील प्रतापपुर येथे जय भद्रा बहुद्देशीय संस्थेचे कार्य खूप मोठे असून जे काही गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणाची गोडी असून आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही अश्या मुलांना आसरा देणे व तसेच शिक्षण हे सर्वश्रेष्ठ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्ञानगंगेची मशाल हातात घेऊन कार्य करत असणाऱ्या जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम आदर्शवत असून भविष्यात या संस्थेत सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आव्हानप्रतापपूर येथे समाजसेवक ग्रामपुरोहित आचार्य गणू महाराज गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी शितल साळवी मॅडम (पुणे ) प्रकाश देवरे, ईशूब पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी संस्थेचा परिचय करून देत श्रीमती ज्योती देवरे( गांगुर्डे ) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गोरगरीब मुलांना आसरा आणि शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून वस्तीगृह सुरू केले शासनाच्या अनुदान स्वरूपात मदतीचे अपेक्षा न ठेवता या मानवादी कार्याला वेळ देऊन मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले व जितेंद्र गांगुर्डे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
Related Posts
न .का. वराडकर बेलोसे कॉलेज चे प्राध्यापक धर्मा कोळी सेवा निवृत्त
न .का. वराडकर बेलोसे कॉलेज चे प्राध्यापक धर्मा कोळी सेवा निवृत्त दापोली दापोली तालक्यातील अनेकांना शिक्षणाची दालन न .का. वराडकर…
रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-बदलापूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
*रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-बदलापूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. .. !* बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) नोकरी व्यवसाय कामधंदा निमित्त बदलापूर…
गणराज आले धरतीवरती”भिरंवडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण ..
*”गणराज आले धरतीवरती”भिरंवडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण .. !* भिरवंडे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)गणरायाचे थोड्याच दिवसात आगमन होईल.मुंबईकर चाकरमान्यांना…