विकास इंग्लीश मिडीयम स्कूल कहाटुळ येथे अवतरले चिमुकले विठ्ठल रुखमाई
*महाराष्ट्रात मोठ्या आस्थेचे व आराधनेचे स्थान म्हणजे पंढरपूर चे विठ्ठल रुखमाई . आषाढी एकादशी निमित्ताने मोठ्या संख्येने वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळतात . जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून जाते .असेच क काहीसे चित्र आज कहाटुळ या गावात दिसून आले. आषाढी एकादशी निमित्ताने विकास इंग्लिश मीडियम स्कूल व के वाय आर पी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने कहाटुळ या गावात माऊली विठ्ठल रुक्माई यांच्या पावन पालखीची दिंडी काढण्यात आली.अगदी चिमुकले मुलं वारकऱ्यांच्या व विठ्ठल रुक्माई च्या पोशाख परिधान करून आले होते. त्यांना पाहून असे वाटायचे की आपण पंढरीलाच आलो आहोत .जसे काही कहाटुळ गावातच पंढरी निर्माण झाली.*
*कार्यक्रमाच्या सुरुवातीला माऊलींच्या पालखीचे संस्थेचे संचालक श्री प्रकाश आप्पा पाटील यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात झाली .त्यानंतर गावभरात हे चिमुकले वारकरी मंडळी जय हरी विठ्ठल या जय घोषात आपल्या शिस्तीचे प्रदर्शन दाखवून संपूर्ण गावात पालखीचे दिंडी काढण्यात आली .संपूर्ण गावकरी सुद्धा या पावन कार्यक्रमात सहभागी झाले. पालक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल श्री एम के गवळे सर सौ मनीषा माळी, सौ रेणुका पाटील ,सौ माधुरी पाटील, कुमारी माहेश्वरी पाटील, कुमारी भारती पाटील ,कुमारी कल्पना गुलाले, कुमारी प्रगती जगदाळे ,सौ ज्योती पाटील व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.*