प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात अवतरले बाल वारकरी

प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात अवतरले बाल वारकरीनंदुरबार : 29/6/23 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, पाऊले चालती पंढरीची वाट या विठुरायाचा जयघोष करीत नंदुरबार शहरातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पश्चिम खान्देश भगिनी सेवा मंडळ संचलित प्यारी बाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली… विद्या मंदिराचे मुख्याध्यापक राहुल मोरे यांच्यासह शिक्षिकांनी दिंडीचे पूजन केले.. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली नामाचा जयघोष करीत दिंडीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.. शाळेची ही बाल वारकऱ्यांची दिंडी नंदनगरी वासियांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली.. या बाल वारकऱ्यांच्या दिंडीमुळे शालेय परिसर भक्तीमय झाला होता… विठ्ठलाची भजने यावेळी सादर करण्यात आली.. विठ्ठलाचे नाम टाळ आणि मृदुंग यांच्या गजराने शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता… यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण करून प्रत्यक्ष अनुभवातून मनमुराद आनंद लुटला.. या संपूर्ण दिंडीचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सोनल वळवी या शिक्षकांनी केले होते… या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी केले होते… संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले… शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा बालदिंडीसह वारकऱ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!