व्हालंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा, कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व्हाॅलंटरी माध्यमीक विद्यालय व्हाॅलंटरी इंग्लिश मिडीयम स्कूल शहादा विद्यामंदिरात अवतरले बाल वारकरी
संपादक = कृष्णा कोळी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, पाऊले चालती पंढरीची वाट या विठुरायाचा जयघोष करीत शहादा शहरातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने व्हालंटरी प्राथमिक माध्यमिक बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली… संस्थेचे विश्वस्त ॲड श्री राजेशजी कुलकर्णी, सौ स्मिता जैन,सौ .शकुतलाबेन सौ.प्रविणा कुलकर्णी मुख्याध्यापिका तारा बेलदार प्राचार्या नयना पाटील यांच्यासह शिक्षिकांनी दिंडीचे पूजन केले.
. इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली नामाचा जयघोष करीत दिंडीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.. शाळेची ही बाल वारकऱ्यांची दिंडी शहादा नगर वासियांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली..
या बाल वारकऱ्यांच्या दिंडीमुळे शालेय परिसर भक्तीमय झाला होता… विठ्ठलाची भजने यावेळी सादर करण्यात आली.. विठ्ठलाचे नाम टाळ आणि मृदुंग लेझीम यांच्या गजराने शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता… यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण करून प्रत्यक्ष अनुभवातून मनमुराद आनंद लुटला.. या संपूर्ण दिंडीचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन या शिक्षीकांनी केले होते…
या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापिका तारा बेलदार यांनी केले होते… संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले… शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा बालदिंडीसह वारकऱ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला..