आषाढी एकादशी निमित्त जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे घणसोली येथे “हरिनाम दिंडी “उत्साहात संपन्न. .!
नवी मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) घणसोली नवीमुंबई येथील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे आषाढी एकादशी निमित्त गुरुवार दिनांक 29/6/2023रोजी सकाळी 7 वाजता “हरिनाम दिंडी “चे आयोजन करण्यात आले होते .संस्थेचे अध्यक्ष श्री भास्कर आव्हाड व सचिव श्री महादेव शिंदे यांच्या आवाहनानुसार सेक्टर 11 मधील साईबाबा मंदिर , साईबाबा चौक ते आदर्श सोसायटी घरोंदा मधील श्री विट्ठल रखुमाई मंदिर पर्यंत “हरिनाम दिंडी “आयोजित केली होती .या हरिनाम दिंडीत ओम साई मॉर्निंग ग्रुप चे सर्व पदाधिकारी , सदस्य व तसेच दळवी अकॅडेमी ब्रँड घणसोली चे सर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते .हरिनाम दिंडीत जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशिष्ट पोशाख व पांढरी टोपी परिधान करून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हरिनाम दिंडीचे संचलन केले .दिंडी “विट्ठल विट्ठल जय हरी विट्ठल “या हरिनामाच्या गजराने सर्वत्र दुमदुमली होती .श्री भास्कर आव्हाड ,श्री प्रमोद गायकवाड , श्री कुंजीर , श्री देशमुख , श्री झगडे , श्री घुले श्री सावंत , श्री घाडगे , श्री कुलकर्णी ,श्री रणपिसे ,श्री कुंभार इत्यादींनी सातत्याने विट्ठल नामाचा जयघोष करीत पहाटेचे वातावरण हरिनाम स्मरण व तेही टाळ च्या साथीने अत्यंत भक्तिमय व आनंदमय केले होते .या दिंडीत प्रदीप जोशी जेष्ठ व्रुत्त पत्र लेखक व मुक्त पत्रकार सहभागी झाले होते .जवळपास 200भक्तगण या हरिनाम दिंडीत उत्साहाने सहभागी होऊन विठुमाऊली च्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचत आनंद घेत होते .हरिनाम दिंडी चे विट्ठल मंदिरात आगमन होताच आदर्श सोसायटीचे श्री दत्तात्रय कुंभार व सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हरिनाम दिंडीचे स्वागत केले .त्यानंतर विट्ठल रखुमाई मंदिरात पूजाअर्चा व महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्व भक्तगण यांनी शिस्तबद्ध रांगेत श्री विठुमाऊली चे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला .तसेच माननीय छबुराव पिंगळे साहेब व माननीय योगेश्वर मडवी साहेब यांनी भक्तगण यांचेसाठी साबुदाणा खिचडी व राजगिरा लाडू प्रसादाची व्यवस्था केली होती .”हरिनाम दिंडी “कार्यक्रमाची जबाबदारी अध्यक्ष श्री भास्कर आव्हाड , उपाध्यक्ष श्री प्रमोद गायकवाड व सचिव श्री महादेव शिंदे यांनी उत्तम रीत्या पार पाडली तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री भास्कर आव्हाड यांनी सर्व उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून हरिनाम दिंडीचा समारोप केला .