तळोदा येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न..

*तळोदा येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न..* दिनांक ३० जून २०२३ रोजी विमलगिरी हॉस्पिटलचा चौथा वर्धापन दिनानिमित्त तळोदा येथे विमलगिरी हॉस्पिटल तळोदा व निम्स हॉस्पिटल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर तसेच जनकल्याण रक्त पेढी नंदुरबार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम भारत माता व आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी १०३ रुग्णांनी या शिबिराच्या लाभ घेतला, १५ रुग्णांना पुढील तपासण्या व उपचारासाठी निम्स हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित करण्यात आले. तर ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराला नंदुरबार येथून निम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिरीषकुमार शिंदे (MS), डॉ. शिरीष परांडे (MD) व निम्स हॉस्पिटल स्टाफ, जळगाव येथून खास उपस्थित असलेले डॉ. उमेश जाधव (MS), डॉ. नेहांश गुप्ता (MBBS) व डॉ. जान्हवी सिंघ (MBBS). तसेच जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. लालचंदाणी सर व स्टाफ तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. विजयराव सोनवणे,शिवसेना कार्यकर्ते सुरजभाऊ माळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सारंग जी माळी (MBBS, PGDFM), रुद्र मेडिकलचे संचालक श्री. सौरभ भाऊ माळी तसेच विमलगिरी हॉस्पिटल स्टाफ व विमलगिरी परिवार यांनी केले. शिबीरास सहकार्य विमलगिरी परिवाराचे नातेवाईक व हितचिंतक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!