तीन लाख रुपयाच्या विदेशी दारूसह 6,72,780/- रुपयांचा मुद्देमाल जप्त ” !!! नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

” तीन लाख रुपयाच्या विदेशी दारूसह 6,72,780/- रुपयांचा मुद्देमाल जप्त ” !!! नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या नंदुरबार जिल्हयातुन मध्यप्रदेश, हरियाणा व गोवा राज्यातील दारूची गुजरात राज्यात तस्करी होत असल्याच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक साो, यांना प्राप्त झालेल्या तक्रारी वरुन त्यांनी नंदुरबार जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध दारूची तस्करी करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

दिनांक 30/06/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी वाहन क्रमांक MH-18-AJ-0995 ही उमदे गावाकडून नंदुरबार शहराकडे अवैध दारू घेवून येणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यावरुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सदर वाहनाची माहिती देवून तसेच बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर हे स्वतः तसेच त्यांचे सोबत पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोकों/ 618 अनिल बडे, पोकों / 659 युवराज राठोड व इतर अंमलदार अशांना घेवून दारूची तस्करी करणा-या वाहनावर कारवाई करण्यासाठी रवाना झाले.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार शहरातील जगतापवाडी उड्डानपुलाच्या खाली उमदे रोडवर सापळा लावला. तसेच गोपनीय बातमीदार यांचे संपर्कात राहून सदरची बोलेरो वाहनाची येण्याची वाट पाहत राहिले गोपनीय बातमीदार याने दारूची वाहतुक करीत असलेली एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो क्रमांक MH-18-AJ-0995 ही उड्डाणपुलाच्या खाली आल्यावर तिला नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी थांबविण्याचा इशारा देवून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन चालकास संशय आल्याने त्याने पोलीसांपासून काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला त्याचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यास जागीच पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अदील शेख रऊफ, वय- 26 वर्षे, रा. गाझी नगर नंदुरबार, असे सांगितले. पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार यांनी संशयित वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात बेकायदेशीर वाहतुक करीत असलेली दारू मिळून आली.
सदर दारूची पोलीसांनी पंचासमक्ष मोजणी केली असता. त्यात खालील नमुद प्रमाणे मुद्देमाल मिळून

आला तो,

1) 3,25,000/- रुपये किंमतीची एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो XL PLUS चारचाकी वाहन तिचा क्रमांक MH-18-AJ-0995,

2) 1,15,000/- रुपये किंतीची विदेशी दारूच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या 180 ML च्या 720 बाटल्या प्रत्येकी किंमत 160/- रुपये प्रमाणे,

3) 1,08,000/- रूपये किंमतीच्या विदेशी दारूच्या मॅकडॉवल नं. 1 कंपनीच्या 180 ML च्या 720 वाटल्या प्रत्येकी किंमत 150/- रुपये प्रमाणे,

4) 57,600 /- रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या ऑफिसर चॉईस ब्लु कंपनीच्या 180 ML च्या 384 बाटल्या प्रत्येकी किंमत 150/- रुपये प्रमाणे,

5) 9,300/- रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या इम्पेरियल ब्लू कंपनीच्या 2 L च्या 6 बाटल्या प्रत्येकी किंमत

1550/- रुपये प्रमाणे,

6) 7,680/- रुपये किंतीच्या विदेशी दारूच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या 750 ML च्या 12 वाटल्या प्रत्येकी किंमत 640/- रुपये प्रमाणे,

7) 50,000/- रुपये रोख रक्कम त्यात 500/- रूपये दराच्या 88 नोटा, 50/- रुपये दराच्या 100 नोटा, 20/-

रूपये दराच्या 22 नोटा, 10/- रूपये दराच्या 56 चलनी नोटा बोलेरो वाहनात मिळून आलेल्या.

एकुण 6,72,780/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांना आढळून आला.

सदर मुद्देमाल, बोलेरो वाहन व रोख रक्कम ही पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करून ताब्यात घेतली. सदरची दारू कोणाची आहे ? याबाबत आरोपीत यास विचारणा केली असता ती अरूण चौधरी रा. नंदुरबार यांची असल्याची सांगितले. सदर बाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शेख अदील शेख रऊफ, वय- 26 वर्षे, रा. गाझी नगर नंदुरबार, तसेच पाहीजे आरोपी अरूण चौधरी रा. नंदुरबार याचेविरुध्द गु. रजि.नं. 575/2023, महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम कलम 65(अ) (ई) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील जगतापवाडी उड्डानपुलाच्या खाली एकुण 6,72,780/- रुपये किंमतीचा दारुचा मुद्देमाल बोलेरो वाहन व रोख रक्कम हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे.

सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील सो., अपर पोलीस अधीक्षक, श्री. निलेश तांबे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन सो. यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोकॉ/618 अनिल बड़े, पोकॉ/ 659 युवराज राठोड, व इतर अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!