गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मालपुर येथे आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा उत्साहात साजरा
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर : मालपुर येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. तसेच काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती. अनेक विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी बद्दल व वारकरी संप्रदायाबद्दल माहिती सांगितली.
रिंगण सोहळ्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री. युवराजजी सावंत, सचिव श्री. कैलासजी सावंत, प्राचार्य सौ. परमेश्वरी राजकुमार उपप्राचार्य धनंजय नेरीकर यांनी चिमुकल्या वारकऱ्यांचे कौतुक केले. सहशिक्षक मनोहर पाटील, उत्कर्ष चौधरी, दिनेश लोहार, नरेश मासुडे, दादा महाले सहशिक्षिका मनीषा माळी, किरण पाटील, हेमा भोई, रेखा मोरे, रेवती मॅडम, कावेरी राजपूत, गायत्री राजपूत, दीपिका मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक योगेश बागले व शिक्षिका सौ. प्रतिभा कुलकर्णी यांनी केले.