मौजे – मानमोडे ता. शहादा
तालुक्यातील मानमोडे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत 1 जुलै कृषी दिन साजरा करून कृषी संजीविनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. यावेळी कृषी विभागातील विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
जिल्ह्यात १जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय कृषी सहसंचालक नाशिक तसेच जिल्हा कृषी अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजिविनी मोहिमेचा समारोप कृषी दिन साजरा करून करण्यात आला. तालुक्यातील मानमोडे येथे उपविभागीय कृषी अधिकारी शहादा,तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यावेळी मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर यांनी रुपरेषा मांडाली.यावेळी मानमोडे येथील कृषी क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य बाबत सखोल मार्गदर्शन केले.उपविभागिय कृषी अधिकारी श्री तानाजी खर्डे यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्राह अनुदान योजनेविषयी मार्गदर्शन केले.मंडळ कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेच्या बाबतीत माहिती दिली. शेतात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पन्नात वाढ होते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना फायद्याचे ठरते म्हणून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.गावाचे सरपंच देविदास मोते यांनी कृषी विभागामार्फत चालु असलेल्या विविध उपक्रम तसेच मोहिमांचा आढावा घेतला व संपूर्ण गवाच्यावतीने समाधान व्यक्त केले .
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री तानाजी खर्डे,मंडळ कृषी श्री राहुल धनगर,कृषी पर्यवेक्षक श्री एकनाथ सावळे, श्री मनोज खैरनार,सौ भीकु पावरा,कृषी सहाय्यक श्री कल्याण पवार,सौ. भाग्यश्री पावरा,सरपंच श्री देविदास मोते, उपसरपंच, इतर सदस्य ,गावातील नवजीवन शेतकरी गट,गोवर्धन शेतकरी गट,हरियाली शेतकरी गट,महिला शेतकरी गट इतर गटांचे सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी सेवक अर्जुन पावरा यांनी आभार मानले.