माळीवाडा परिसरातील लोकांनी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव

“माळीवाडा परिसरातील लोकांनी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव !! “नंदुरबार जिल्हा हा अंत्यत हा संवेदनशिल जिल्हा म्हणुन महाराष्ट्र राज्यात ओळखला जातो. अशा या जिल्ह्यात या वर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी दिनांक 29/06/2023 रोजी आले होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात जणता काही अंशी भयभीत झाल्या होत्या.नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरची बाब लवकर ओळखुन जिल्हा स्तरावर शांतता समितीच्या व मोहल्ला समितीच्या मिटींगा घेवुन वातावरण आल्हादायक बनविले. तसेच त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला बकरी ईद व आषाढी एकादशी निमीत्ताने शांतता राखण्याचे आवाहन देखील केले होते. तसेच त्यांनी बकरी ईद च्या दिवशी मुस्लीम बांधवानी कुर्बानी देव नये असा एक विचार मांडला. तसेच जिल्ह्यात चेक नाके लावून गायी व बैल यांची कोणतीही अवैधरित्या वाहतुक होवु नये म्हणुन कसोशीने लक्ष दिले.पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधवानी सकारात्मक प्रतिसाद देवून बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. तसेच पोलीसांनी उबारलेले चेक नाके वर पोलीसांनी मोठ्या प्रमाणात गायी व बैल यांचे वाहतुक होणार नाही याची काळजी घेतली व मोठ्या प्रमाणात गायी व बैलांची वाहतुक करणारे वाहने पकडुन त्यांची रवानगी गोशाळेत केली.. त्यामुळे गायी व बैलांना मोठ्या प्रमाणात अभय मिळाले.पोलीसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बकरी ईद व आषाढी एकादशी सण हे उत्साहात व आनंदात साजरा झाले. त्यामुळे जिल्हात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. या गोष्टीची जाणीव ठेवून आज रोजी माळीवाडा परिसरातील नागरिकांनी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांचा श्री संत सावता माळी मंदिरात मा उपविभागीय अधिकारी श्री. संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र + कळमकर यांचा प्रातिनिधीक स्वरुपात पुष्पगुच्छ देवून गौरव केला.सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना माळी समाजातील नागरिकांनी पोलीसांचा केलेल्या गौरवाबद्दल आभार मानून आगामी सण उत्सव देखील शांततेत पार पाडण्याचे आश्वासन दिले.सदर कार्यक्रमास माळी समाजाचे पंच कमिटीचे सभासद माणिक माळी, तसेच नगरसेवक श्री. आनंद माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक निंबा माळी, उद्योजक अविनाश माळी, भाजपा सरचिटणीसनिलेश माळी, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक प्रकाश माळी, बाबुलाल माळी, जगन्नाथ माळी, विजय माळी, व इतर 50 ते 60 समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!