छावा मराठा युवा महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदि अमोल कोल्हे यांची नियुक्ती

*छावा मराठा युवा महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदि अमोल कोल्हे यांची नियुक्ती*जळगाव – छावा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनाजी येळकर पाटील हे नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी सध्याच्या राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा घेत उपस्थितांना संघटनेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गेल्या 4 वर्षांपासून जळगावच्या जिल्हाध्यक्ष पदि कार्यरत असलेले अमोल कोल्हे यांची संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे . यासह त्यांनी जळगाव जिल्ह्याची समस्त कार्यकारणी बरखास्त करून जळगाव ,धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांना दिलेले आहे. सर्व नियुक्त्या करण्यासाठी अमोल कोल्हे आपल्या सहकाऱ्यांसह लवकरच जिल्हानिहाय दौरे करणार आहेत. तसेच याच बैठकीत अमोल कोल्हे यांच्या शिफारशीनुसार संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटिल यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उप महानगर अध्यक्षा सौ. निलूताई इंगळे यांची महिला जळगाव महानगर अध्यक्ष, श्रीमती विमलताई वाणी यांची महिला महानगर उपाध्यक्ष , राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्षा कु. दिपीका भामरे यांची महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. विक्रम महाले यांची जळगाव जिल्हा कायदेविषयक सल्लागार, कु. कोमल जाधव यांची युवती सोशिअल मीडिया प्रमुख तर राष्ट्रीय दलित पँथरचे महानगर अध्यक्ष श्री. शांताराम भाऊ अहिरे यांची जळगाव रिक्षा युनियन महानगर अध्यक्ष या पदांवर नियुक्त्या केल्या. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष संजयजी जाधव , पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश सरकटे पाटील, वाहतूक संघटनेचे अंगद पवार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!