– शहादा तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये जाहीर केल्या आहेत.
शहादा,दि.4(प्रतिनिधी)
विविध शासकीय आस्थापनेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मुलन व भ्रष्टाचारासंबंधीत नागरिकांच्या तक्रारी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत सोडवण्यासाठी शहादा तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या भ्रष्टाचार निर्मूलन तालुका समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून गिरधर विक्रम मोरे, प्रसन्न सुभाष बंब, भरत रघुनाथ पाटील, श्रीमती सुलभा रंगराव पवार यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तहसीलदारांकडून तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य नेमण्यासाठी शिफारशी मागवल्या होत्या. त्यांच्या शिफारशीस अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्यांची निवड केली आहे. या भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष तहसिलचे प्रभारी सहायक किंवा उपजिल्हाधिकारी असून सदस्य म्हणून पोलीस उपअधीक्षक, उपअभियंता जलसंपदा विभाग, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय मृद संधारण अधिकारी, सहायक / उप निबंधक सहकारी संस्था, गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून मा.तहसिलदार कामकाज बघणार आहेत. या समितीला शाशनाचे कोंदण लाभले असल्याने शासनाचे अंगिकूत सर्वच विभागा संबंधित नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीचा निपटारा करण्यावर शहादा तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर नियुक्त असलेल्या अशासकीय सदस्यांचा राहील. म्हणून नागरिकांनी आपआपल्या तक्रारी अशासकीय समिती सदस्यांकडे द्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे. या निवडीबद्दल नंदुरबार जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ पाटील, सुरेश विठ्ठल पाटील, फेंद्या पारशी पावरा, रमाकांत विठ्ठल पाटील, वैभव पाटील, महेंद्र मोरे, हृदयेश चव्हाण, डी.जी.पाटील सर, प्रदीप कामे, दगडूप्रसाद जायसवाल, भालेराव साळुंखे, योगेश बोथरा, साहेबराव पाटील, सौ.संगिता जायसवाल, विजय धनगर, मोहन पाटील, शाकीर ईसाणी तसेच जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.