*धुळे: * सावळदे पुलाच्या संरक्षक जाळी बसविण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आदेश, “व्हाईस ऑफ मीडियाच्या” तत्परतेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल…
धुळे: व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सावळदे पुलाचा संरक्षक जाळी लावण्याचा प्रश्न लागला मार्गी
व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या प्रयत्नांमुळे शिरपूर येथील सावळदे पुलाचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना सावळदे पुलासंदर्भात कैफियत सुनावली असता पालकमंत्र्यांनी व्हॉइस ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांना आश्वासित करत तात्काळ सावळदे पुलावर संरक्षक जाळी बसविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत,
सावळदे पूल हा मृत्यूचा सापळा बनला असल्याने या पुलावरून तापी नदीपात्रामध्ये दिवसाआड आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती, या पुलाला संरक्षण जाळी बसविण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरून असतानाच याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते, परंतु व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला असता, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ सावळदे पुलावर संरक्षक जाळी बसविण्याचे जिल्हाधिकारी जल शर्मा यांना आदेश दिले, व गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी वाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडताच पालकमंत्र्यांनी या मागणीचे स्वागत करत व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांना आश्वासित केले, व तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, अशाप्रकारे सावळदे पुलाचा शिरपूरकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरासाठी असलेला गंभीर प्रश्न व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सहजपणे मार्गे लागला आहे, त्यामुळे शिरपूरकरांनी वाईस ऑफ मीडियाचे मनापासून आभार मानले आहेत.