राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्या केशरानंद जिनींग येथे जाहीर मेळावा
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
दोंडाईचा ता. शिंदखेडा. सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही प्रचंड अस्थिर स्वरूपातील आहे हे आपण सर्वजण जाणता. राजकारणामध्ये काम करत असताना अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आज पर्यंत कोणालाही पहावयास मिळालेली नाही. महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय स्थित्यंतरांवर श्री ज्ञानेश्वर भामरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते व नामदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी पक्षांतर्गत घेतलेल्या भूमिकेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच पक्षात दोन मतप्रवाह निर्माण झाल्यानंतर कुठल्यातरी एका भूमिकेवर निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र तो निर्णय त्यांना का घ्यावा लागला? त्या मागची प्रमुख कारणे काय आहे? याबाबत संवाद साधण्यासाठी शनीवारी ८ जुलै संध्याकाळी चार वाजता केशरानंद जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी बाम्हणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व सकारात्मक दृष्टिकोनातून या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्वांनी श्री ज्ञानेश्वर भामरे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांची भूमिका समजून पाठिंबा देण्यासाठी व आपल्याशी हितगुज साधण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती आपले विनीत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा मतदारसंघ