शहादा वनपरिक्षेत्रातील दोन लाख लाचेची मागणी करणारे वनपाल वनरक्षकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
वनसंरक्षण कायद्यान्वये अटक झालेल्या आरोपीला जामीन मिळण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यास लाचेची मागणी
1) संजय मोहन पाटील, वय – 54 वर्ष, वनपाल दरा शहादा जिल्हा नंदुरबार. नेमणूक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय शहादा.
2) दीपक दिलीप पाटील, वय 27 वर्ष, वनरक्षक शहादा, नेमणूक-वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय शहादा.
3) नदीम खान पठाण, वय 37 वर्ष, राहणार-शहादा जिल्हा नंदुरबार, खाजगी इसम 2,00,000/- रुपये.
दिनांक 08/05/ 2023
दिनांक 09/05/2023
तडजोड अंती.- 1,00,000/-रुपये. ची मागणी केली.
तक्रारदार यांचा लहान भाऊ याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे गुन्हा नोंद असून त्यामध्ये तक्रारदारांचा भाऊ यास अटक केलेली आहे. दाखल गुन्ह्यात तसेच जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी आरोपी क्रमांक 3 यांनी आलोसे क्र. 1 व 2 साठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंति एक लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. आलोसे क्र. एक व दोन यांनी आरोपी क्रमांक 3 यास प्रोत्साहन दिले तसेच सरकारी वकीलाकरिता पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे
ही कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे