धुळे: वाघाडी येथील जवान लान्स नायक मनोज संजय माळी यांच्यावर उद्या रविवार सकाळी 10वा. शासकीय इतमाात होणार अंत्यसंस्कार:
धुळे: शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील अतिशय गरीब कुटुंबातील श्री संजय बुधा माळी हे शेतकरी कर्म आणि कर्तव्यावर विश्वास ठेवून आपल्या अनमोल दोन रत्नांना उच्च शिक्षणाची दिशा देऊन मोठा मुलगा चिरंजीव चेतन आणि चि.मनोज परिस्थितीनुसार चेतन याच बारावीपर्यंत शिक्षण करून जिद्दीने प्रथम डिप्लोमा फार्मसीला ऍडमिशन करून पुढे डिग्रीसाठी आग्रही असल्यामुळे बी फार्मसी करून पुन्हा उच्च शिक्षणाचा आग्रह करुन एम फार्मसीसाठी प्रवेश घेऊन मुलाचे उच्चशिक्षण करून समाजात चांगल्या पद्धतीने सन्मानित दर्जा देखील मिळवला, तर नंतर लहान मुलगा चि. मनोज याचे प्राथमिक शिक्षण गावातील मराठी शाळेत पूर्ण करून तर नंतर शिरपूर शहरातील एस पी डी एम महाविद्यालय येथे प्रवेश घेऊन सन 2017 18 या वर्षी एनसीसी कॅडेट मध्ये कॅडेट सीनियर ऑफिसर म्हणून कार्यरत असताना 24 मार्च 2019 रोजी ते भारत मातेच्या सेवार्थ सैनिक पदावर औरंगाबाद येथे रुजू झाले.अवघ्या दोन-तीन वर्षाची नोकरीमध्ये त्यांनी त्यांच्या कामाची छबी संपूर्ण पंचक्रोशीतील गावांवरती व स्वतःच्या वाघाडी गावात देखील नव तरुणांवरती उमटवली. तसेच आमच्या संपूर्ण कुटुंबाला कर्तव्य आणि निष्ठा कशी असावी याचे उत्तम उदाहरण त्याच्याकडनं शिकावेसे वाटते तसेच चि.मनोज यांनी आपल्या कर्तव्य बजावत असताना तीन वर्षांमध्ये दोन प्रमोशन देखील घेतली. नोकरी करत असताना देखील लान्स नायक मनोजबापू यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या व सोबतचे जवानांच्या सानिध्यात राहून एक हिरा म्हणून आपलं स्वतःचं स्थान आपल्या कर्म व कर्तव्य वर विश्वास ठेवून नाव कोरून ठेवलं, साधारण दोन महिन्यापूर्वी त्याचा हिमालय पर्वतरांगांवरती सिक्कीम राज्यातील ऊंच डोंगरावर चीन,भूतान,भारत साधारण 200 ते 400 मीटर अंतराने असलेल्या ठिकाणी देशाच्या सीमेवर नोकरी करत होते. तरी गुरुवार दिनांक 6.7.2023 रोजी पहाटेच्या सुमारास पाय घसरून 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळले, सोबतचे 4-5 जवानांनी लागलीच संबंधित विभागाला माहिती दिली विशेषता या जवानांनी व संबंधित विभागांनी त्याच्या घरी फोन द्वारे माहिती दिली त्यामुळे वाघाडी येथील त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी अनेकांची गर्दी जमली तरी वाघाडी येथील ग्रामस्थ भर पावसामध्ये अंत्यसंस्काराची जय्यत तयारी करण्यासाठी झटत आहेत त्याचदरम्यान गावातील मुख्य प्रवेशद्वाराला देखील मृतसैनिकाचे नाव देखील देण्यात आले आणि गावाची पांढरी म्हणून ओळखली जाणारी गावठाण जागेवर साफसफाई करून संपूर्ण रस्त्यालगत व परिसरात श्रद्धांजलीचे बॅनर धडकले व त्या बॅनरवर जवानाचे नाव व देशाचे नाव लौकिक झाल्याचा संदेश देशाप्रती मोठ्या प्रमाणावर झळकला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पंचक्रोशीने व वाघाडी गावातील ग्रामस्थांनी आणि सरपंच किशोर माळी आणि त्यांचे कार्यकारी मंडळ यांनी या अमर जवानाच्या अंतिम यात्रेला व शोकसभेला हजर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमचा वीर शहीद जवान मनोज बापू यापुढे तो आमच्या संपूर्ण कुटुंबात अमर शहीद जवान या नावाने देखील आमच्या हृदयावर कोरला गेला असून तो आमच्या कुटुंबाचा एक हिरा होता परंतु आज देशभक्ती आणि त्याचे कर्तव्य व कर्म याच्या बळावर देशासाठी शहीद झाला आहे,म्हणून आम्हाला सार्थ अभिमान देखील आहे.