*विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे वृक्षारोपण संपन्न* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे . . या चरणाची आजच्या नैसर्गिक परिस्थितीपाहता वृक्षांची लागवडीला जोमाने अमलात आणण्याची मोठ्या स्तरावर गरज आहे . कारण की यंदाच्या तापनाच्या आढावा घेतला दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा चढत दिसला . ही भविष्यासाठी मानवास धोक्याची घंटी आहे . येणाऱ्या पिढीचे आयुष्य जर नैसर्गिक वातावरणात घालवायचे असेल तर आजच्या पिढीने त्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे . प्रत्येकाने आपले आद्य कर्तव्य समजून एक तरी वृक्ष लागून त्याच्या संगोपन केलं पाहिजे . भविष्याचे निसर्गरम्य हिरवेगार दृश्य डोळ्यासमोर ठेवून विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे वृक्ष लागवड करण्यात आली . संस्थेचे संचालक श्री आप्पासाहेब प्रकाश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी शाळेचे प्रिन्सिपल श्री एम.के.गवळे सर व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , सौ मनीषा माळी , माहेश्वरी पाटील , रेणुका पाटील , प्रगती जगदाळे भारती पाटील , कल्पना गुलाले , माधुरी पाटील , महिमा पाटील व शिक्षकेतर कर्मचारी ज्योती पाटील उपस्थित होते .*
Related Posts
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा १५ आँगस्ट २०२३ रोजी रेल्वे रोको आंदोलनाला रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांच्या विनंती मुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती
मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा १५ आँगस्ट २०२३ रोजी रेल्वे रोको आंदोलनाला रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांच्या विनंती मुळे तात्पुरत्या स्वरूपात…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरसावले तळोद्याचे समाजकार्य महाविद्यालय
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरसावले तळोद्याचे समाजकार्य महाविद्यालयमहाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजा करून खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली…
चिमठाणे येथे वाळू विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको…
चिमठाणे येथे वाळू विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको… चिमठाणे येथे बूराई नदी पात्रात रात्रंदिवस उपसा चालू आहे लाखो रुपयाची रेती रोजची…