नेर: खान्देशच्या विकासासाठी कटिबद्ध राहील कॅबिनेट मंत्री श्री अनिल पाटील यांचे प्रतिपादन; नेर येथे सदिच्छ भेट:
नेर: धुळे तालुक्यातील नेर येथील माजी सरपंच शंकरराव खलाणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट प्रसंगी मंत्री अनिल पाटील बोलत होते. यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला जनतेचा व नेत्यांचा आशीर्वाद मिळाला व मी कॅबिनेट मंत्री झालो माझा अमळनेर मतदार संघ धुळे जिल्हाशी जवळीक असल्याने माझे ॠनाबंध मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून खान्देशमध्ये कामाला प्राधान्य देण्यार आहे. यानिमित्ताने खान्देशसह महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळणार आहे.
यावेळी भदाणे येथील आराध्य दैवत भटाई देवीचे सपत्नीक जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.या वेळी नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे, माजी जि.प.सदस्या मनिषा शंकरराव खलाणे, प्रकाश खलाणे, मोहन माळी,भटू आण्णा खलाणे,आर.डी.माळी,वसंत देशमुख, गुलाब मगरे,संतोष ईशी,शंकर कोळी,डॉ सतीष बोढरे,बिपीन सोनवणे, रवी वाघ, प्रविण गुरव,सुरज खलाणे,दिपक मोरे,तुषार जयस्वाल, दिपकशेठ खलाणे, शरदशेठ खलाणे,राकेश अहिरे,उखडू बिल आदि उपस्थित होते.