चि. उमेश रजेसिंग कोळी यांची PSI परिक्षेत यश मिळाल्याने त्यांना शुभेच्छा देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता सोनवणे
दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईंचा . दिनांक ४/७/२०२३ रोजी MPSC परिक्षेचा निकालात चि. उमेश रजेसिंग कोळी यांची PSI परिक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर यश मिळाल्याने त्यांच्यावर परिवार,मित्रपरिवार , नातेवाईक व समाजातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चि उमेश रजेसिंग कोळी हे श्री रजेसिंग मंगा कोळी (ईशी) यांचे चिरंजीव आहेत त्यांचे मुळ गाव अंतुर्ली आहे ह.मु. काकर्दा ता. शहादा जि. नंदुरबार येथे राहतात व वडील नोकरीला असल्यामुळे पालघर येथे वास्तव्य आहे. उमेश कोळी यांची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्याने त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भगिनी समाज प्राथमिक विद्यामंदिर पालघर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण एस. टी. झोन काॅलेज पालघर येथे मेडिकल इंजिनिअरिंग केली त्यानंतर उमेश कोळी यांनी MPSC परिक्षेची तयारी २०१९ पासुन सुरवात केली २०२० prelim pass झाले नंतर ग्राऊंड व ओरल परिक्षा दिली अशा प्रकारे आपले शिक्षण क्षेत्रात प्रगती केली त्यात त्यांनी आपल्या अभ्यासात परिश्रम घेऊन यश संपादन केले उमेश कोळी यांनी MPSC परिक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता सोनवणे यांना कळाल्यावर सर्व प्रथम उमेश कोळी यांचा सत्कार धुळे येथील समृद्धी सोसायटी येथे दिनांक ९/७/२०२३ रोजी रविंद्र उखडू सावळे थाळनेरकर यांच्या घरी जाऊन सत्कार केला व शानाभाऊ सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांना सांगितले की गोरगरीब जनतेच्या सेवा आपल्या हातुन व्हाव्यात व अजुन उंच पद घेऊन समाज कार्य आपल्या हातुन होवो या शब्दात शुभेच्छा दिल्या त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता सोनवणे, श्री रविंद्र सावळे,सौ. मिनाताई सावळे सागर सावळे,निशा सावळे, कल्पेश कोळी, प्रसाद ठाकुर, जय भामरे,यश भामरे, मनमोहन,पवन रोकडे व मित्र परिवार उपस्थित होते.