दुसखेडा गावात दोन महिन्या पासून पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती४ की.मि. होते पाण्याची वाहतूक

दुसखेडा गावात दोन महिन्या पासून पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती४ की.मि. होते पाण्याची वाहतूक मनवेल ता.यावल : दुसखेडा येथे गेल्या दोन महिन्या पासून पिण्याचे पाणी टंचाई जाणवत असून चार की.मी.अंतरावरुन महिलांना पाणी आणावे लागत आहे.येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक दोन महिन्या पासून गावात हजेरी लावली नसल्यामुळे कार्यलय बंद आहे तर येथील ग्रामस्थं १० जूलै रोजी सोमवारी गावातील समस्या घेऊन यावल प.स.कार्यलयात गटविकास अधिकारी यांची भेट घेणार आहे. येथील १७ लाभार्थीचे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर असून नमुना न.८ घराच्या उतारा लाभाथ्यांना यावल येथे मागत असून ग्रामसेवक येत नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे,दोन महिन्या पासून गावात ग्रामसेवकाने हजेरी लावली नसल्यामुळे ग्रामसेवक अभावी रहीवाशी दाखले घराचा उतारा दारीद्ररेषेच्या दाखला सह विविध प्रकारच्या कागदपत्रे करीता ग्रामस्थांना अडचणी येत आहे अभावी येथील ग्रामस्थ विविध समस्यानी त्रस्त झाले आहे.येथील पाण्याच्या पाण्याची समस्या व नवीन ग्रामसेवक ची समस्या सोडवा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!