नंदुरबार जिल्ह्यात मनसेच्या वतीने एक सही संतापाची
राज्यातल्या राजकारणात सातत्यानं सुरु असलेल्या घडामोडींबद्दलचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज नंदुरबार जिल्ह्यात एक सही संतापाची हे आंदोलन केलं गेलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा स्थानकाजवळ मनसेचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं. राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, त्यांना तो व्यक्त करता येत नाही, अशावेळी त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्याकरता पक्षानं हे आंदोलन केल्याचं नागरिकांनी सांगितलं