पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस

नेर: पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस नेर: पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा रहिवासी असून – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस देण्यात आले.तसेच पुण्यातील सदाशिव पेठ येथे एक तर्फी प्रेमातुन एका माथेफिरू ने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला.मात्र तरुणीला वाचविण्यासाठी दोन जिगरबाज तरुण पुढे आलेत.हर्षद पाटील व लेशपाल जवळगे ह्यांनी तरुणीला वाचविले शिवाय त्या माथेफिरू ला पकडून ही दिले.उल्लेखनीय बाब म्हणजे हर्षद पाटील हा शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा आहे. पुण्यात तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला आहे. सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील गजबजलेल्या सदाशिव पेठ मध्ये एका माथेफिरू ने दिवसाढवळ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला चढविला. हयावेळी अनेकांनी बघ्याची भुमिका घेतली. मात्र हर्षद पाटील व लेशपाल जवळगे या दोन जिगरबाज तरुणांनी जिवाची परवा न करता तरुणीला वाचविले शिवाय त्या माथेफिरू ला पकडून दिले. म्हणून दोन्ही जिगरबाज तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे शाबासकी ही मिळत आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन्ही तरुणांना 51 हजार रुपये चे बक्षीस जाहीर केले होते. यांची कामगिरी पाहुन महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोघांना प्रत्येकी 5 लाखाचे बक्षीस घोषित केले. विशेष म्हणजे हर्षद पाटील हा शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा रहिवासी आहे. तो येथील कापसाचे व्यापारी मच्छिंद्र पाटील यांचा लहान चिरंजीव आहे. हर्षद हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे.शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांचे सह अनेकांनी फेसबुक वर लाईक शेअर करत धाडसाबद्दल हर्षद चे कौतुक केले आहे. संकटसमयी काहीही न पाहता कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला धावुन जाणे.आपल्या रक्तातच असुन हा मातीचा सर्वात चांगला गुण आहे.हे हर्षद च्या कृत्याने दाखवुन दिले आहे असे आ.रावल यांनी हर्षद पाटील ला शाबासकी दिली. एकंदरीत हर्षद च्या धाडसाने शिंदखेडा तालुका वासियांची मान निश्चितच उंचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!