सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व वनविभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल रोपण सातपुड्याच्या जंगलात

🌱 *सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व वनविभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल रोपण सातपुड्याच्या जंगलात…* 🌱 दिनांक ९ जुलै २०२३ रोजी तळोदा तालुक्यातील शेवटचे गाव अलवान या भागातील डोंगर परिसरात सीडबॉल रोपणाचा उपक्रम राबिण्यात आला. वनरक्षक श्री. गिरधन भाऊ पावरा यांच्या मदतीने तळोदा वनविभागाकडून २०० सीडबॉल मिळालेत. यावेळी स्वतः गिरधन भाऊ पावरा अलवान येथील गावकऱ्यांसोबत या उपक्रमासाठी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले तर गिरधन भाऊंनी बीज गोळा करण्यापासून तर सीडबॉल तयार करण्याची प्रक्रिया व त्यांचे रोपण करण्याची पद्धत प्रात्यक्षिका द्वारे समजावून सांगितली. तसेच विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सारंग जी माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते बोलत होते की वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे व त्यासोबतच वनसंरक्षण करणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी गिरधन भाऊ पावरा अलवान येथील ग्रामस्थांच्या मदतीने खूप कष्ट घेत आहेत हे तेथे प्रत्यक्ष गेल्या नंतरच लक्षात येते. त्यांचे कार्य अभिनंदनीय तसेच अनुकरणीय आहे. सीडबॉल रोपण हा जंगल वाढीसाठी खूप छान असा उपक्रम आहे व असे उपक्रम नित्यनेमाने लोक सहभागातून झाले पाहिजेत. सेवाभावे प्रतिष्ठानने पर्यावरण रक्षणासाठी हा असा उपक्रम राबवून खूप छान काम केले आहे, त्यांच्या कार्यास शुभेच्छा. या उपक्रमासाठी सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते चि.सुमित गोडसे, चि.आशिष मराठे, चि.रोहन गुरव व अलवान गावचे ग्रामस्थ श्री. जगन पवार, श्री. राजेश नाईक व श्री. देवीसिंग पवार यांनी सहकार्य केले. व सेवाभावे प्रतिष्ठान उपाध्यक्ष श्री.सागर पाटील,कार्याध्यक्ष श्री.संतोष पाटील,सचिव श्रीमती.कविता कलाल संचालक श्री.अनिल नाईक श्री.नकुल ठाकरे यांनी नियोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!