आदिवासी टोकरे कोळी जमातीचे रमेश लहु कोळी (आबा भगत) यांच्या संशयास्पद मृत्यू ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली टोकरे कोळी जमातीचा शिरपुर शहर पोलिस स्टेशनवर मोर्चा
प्रतिनिधी गोपाल कोळी
शिरपुर ता. दिनांक ७ जुलै २०२३ रोजी कै.रमेश लहू कोळी (आबा भगत) अंदाजीत वय ६७ वर्ष यांचा मांडळ ता शिरपुर येथे रोड लगत बंद दुकाना बाहेर ओट्यावर संशायपद मृत्युदेह आढळून आला त्यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते त्यावेळी घटनेची माहिती शिरपुर शहर पोलिस स्टेशन येथे कळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत चौकशी केली व कै. रमेश कोळी उर्फ आबा भगत यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथे दाखल केल्यानंतर घटनेची माहिती सर्वत्र परिसरात पसरल्याने उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथे मोठ्या प्रमाणात समाज बांधव मित्रपरिवार व नातेवाईकांचा जमाव झाला होता त्यावेळी नातेवाईकांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता त्यानंतर या घटनेचा शिरपुर शहर पोलिस प्राशासणाकडून कुठल्याही प्रकारचा उलगडा आज प्रयत्न केला जात नसल्यामुळे आदिवासी टोकरे कोळी जमाती कडून पोलिस प्राशासणावर नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे आज दिनांक ११ जुलै २०२३ रोजी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वाल्मीकी नंगर शिरपुर येथुन मा. पोलीस स्टेशन शिरपुर पर्यंत आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीचा निषेध मुक मोर्चा काढण्यात आला व पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिले आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की कै रमेश कोळी उर्फ आबा भगत यांचा मृत्यू देह आढळून आला त्या परिसरातील सि सि टिव्ही कॅमेरे आहेत त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कै रमेश लहु कोळी उर्फ आबा भगत यांच्या संशयास्पद मृत्यू ची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात यावी व रमेश कोळी उर्फ आबा भगत यांच्या परिवाराला न्याय द्यावा असे शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले त्यावेळी
आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीचे समाज बांधव मित्रपरिवार नातेवाईक व महिलांनी दिनेश कोळी किरण कोळी राहुल कोळी हिरा दादा वाकडे गोपाल कोळी गोलु कोळी वाल्मिक कोळी विनायक कोळी मोहन कोळी प्रभाकर कोळी पेखाबाई कोळी सरलाबाई कोळी सखुबाई कोळी लताबाई कोळी उषाबाई कोळी केवळबाई कोळी मोठ्या प्रमाणात मुक मोर्चा मध्ये समाज बांधव सहभागी झाले होते