सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
पनवेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
पनवेल तालुक्यातील धामणी येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयात शनिवार दिनांक ०८ जुलै 2023 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप संस्थेचे मार्गदर्शक मनोज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. पंकज गायकर व सोनाली म्हसणे यांनी वह्या वाटपाच्या कार्यक्रमांची माहिती देत शिक्षणासाठी वह्यांचे महत्त्व मुलांना पटवून दिले तसेच सह्याद्री सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्री बन्सी ढवळे यांनी सदर संस्था शाहू महाराजांच्या आदर्शावर चालत असून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती त्यांनी सांगितली. ॲड.प्रताप पाटील यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे संदेशाचे महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही कष्ट घेत शिक्षण घ्याल तर तुम्ही तुमची सर्वांगीण प्रगती करू शकाल तसेच तुमच्यावरील अन्यायावर प्रतिकार करून तुमचे मत तुम्ही ठामपणे समाजासमोर मांडू शकता असे मुलांना सांगितले. गरीब विद्यार्थी हेच नवीन इतिहास घडवतात असे श्री. मनोहर गावडे यांनी मुलांना सांगितले. थोर महापुरुषांचा आदर्श घेत चांगले शिक्षण घ्यावे व तुम्ही मोठे झाल्यावर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत कराल अशी मुलांकडून अपेक्षा आण्णासाहेब आहेर (पत्रकार) व्यक्त केली. संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, विविध शाळांमध्ये वह्या वाटप करून गरीब विद्यार्थ्यांना मोलाचा हातभार लावला जातो. प्रमुख पाहुणे मा. नगरसेवक, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मनोज भुजबळ यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा करून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गाईड्स व पुस्तके लवकरच दिले जातील असे जाहीर केले. श्री. बन्सी ढवळे, श्री. संतोष पारसे, श्री. मनोहर गावडे, ॲड. प्रताप पाटील, श्री. राजाराम मगदुम, श्री. आनंद यादव, श्री. प्रकाश डोंगरे, सौ. लता केसरकर, सौ. सारिका गावडे, श्री. घनश्याम घोरपडे, श्री.शशिकांत कुंभार, सौ.संपदा पाटील,सौ.अनिता ढवळे, सौ.प्रिती मगदुम, कु.विशाल ढवळे, कु.श्रद्धा पाटील, कु.वैभवी कुंभार यांनी वह्या वाटपाच्या उपक्रमाला उपस्थिती दर्शवत सहकार्य केले, अल्प आहाराचे नियोजन ॲड.प्रमिला भाईंगडे यांच्या वतीने करण्यात आले.