मोठे कडवान इथे PSI पदी निवड झालेल्या डॉ. कु.स्मिता कंतिलाल वसावे यांचा नागरि सत्तकार करण्यात आला.. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, मित्र मंडळ, परिवार, सेवा निवृत्त, शासकिय व निम शासकिय कर्मचारि यांनी केले होते.. आयोजन समीतीचे सदस श्री. शमुवेल गावीत सर यांनी सर्वांचे स्वागत केले . प्रास्त|विक श्री. डीगंबर गावीत सर यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पं.स.नवापूर सभापती मा. श्रीमती बबीता नरेद्र गावीत ह्या होत्या तर प्रमुख् पाहुणे उपसभापती मा. श्री. शिवाजीदादा गावीत हे होते.
मान्य वरानी आपल्या मार्गदर्शन केले व उपस्थित लोकांना मेहनत व जिद्द याचे फळ नक्कीच मिळते असे सांगितले.
डॉक्टर नचिकेत यांनी डॉ.स्मिता वसावे यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या यशा बद्दल मार्गदर्शन करताना म्हटले की, आपल्या आदीवासी समाजातिल मुले-मुली आता पुढे येत आहेत ही चांगली , गौरवाची व अभिमानाची बाब आहे म्हणून शिक्षण घेणारे मुले आहेत त्यांनी PSI डॉ.स्मिता यांचा आदर्श घ्यावा असे म्हटले.
डॉक्टर स्मिता वसावे यांनी त्यांच्या भाषण|त म्हटले की, ध्यॆय ठरले पाहिजे, जिद्द, चीकाटि,मेहनत व हार न मानणॆ कारण पपांना आज मी मिस करते.. आई पप्पा शिक्षक असून मी मज्जा केली असती पण मला काही तरी चांगले अधिकारी व्हायचे आहे अशी जिद्द ठेवून आज मी यश मिळविले आहे.. वडील गेल्यावर माझ्या आईने मला खूप साथ दिली…म्हणून मी आज इथे आहे..तुम्ही ही हिम्मत हरवू नका.. असे म्हटले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास गावीत उपसरपंच ,डॉ.धनसिंग वळवि, वसंत वसावे पोलीस, अविनाश वळवी ग्रा.पं.सदश्य, राकेश वसावे पो.पाटिल्, सखाराम गावीत, योगेश गावीत तलाठी, किरण गावीत शिक्षक, यशवंत गावीत रेलवे कर्मचारी. सुत्रसंचलन श्री.शमुवेल गावीत सर यांनी केले तर प्रास्त|विक श्री. डीगंबर गावीत सर यांनी केले आभार श्री.योगेश गावीत तलाठी यांनी केले .