रिटायर्ड शिक्षकांऐवजी डी.एड.बी.एड.धारक तरूण शिक्षक भरा: बिरसा फायटर्सची मागणी

*रिटायर्ड शिक्षकांऐवजी डी.एड.बी.एड.धारक तरूण शिक्षक भरा: बिरसा फायटर्सची मागणी**शहाद्याचे गटशिक्षणाधिकारी योगेश सावळे यांना निवेदन*शहादा:जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी डीएड, बीएड पात्रताधारकांची कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री दिपक केसरकर व उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन शहादा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी योगेश सावळे यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दि.०७ जुलै २०२३ रोजी नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा.उच्च न्यायालयात रिट याचिकांची कारणे देत शिक्षक भरती विलंब होण्याची शक्यता असल्याने कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्ती शिक्षकांची वयोमर्यादा ७० पर्यंत असलेल्या नियुक्ती करण्याचे अजब परिपत्रक काढले.परंतु,राज्यात गेल्या १२ वर्षापासून रिक्त असलेल्या जागा(अपवाद वगळता)भरल्या नसल्याने लाखो डीएड,बीएड पात्रताधारक बेरोजगार आहेत.राज्यात लाखो पात्रताधारक युवक बेरोजगार असतांना सेवानिवृत शिक्षकांची नेमणूक करणे कितपत योग्य आहे?काम करण्याची क्षमता लक्षात घेऊन सेवानिवृत्ती वय ५८ वर्षे आहे.आणि राज्यात लाखो युवक बेरोजगार असतांना ७० वर्षे वयोमर्यादा पर्यत सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूकीचे परिपत्रक काढता;हे किती दुर्दैव आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यासंदर्भात परिपत्रक आहे.त्याऐवजी तरूण डी.एड.बी.एड.धारक उमेदवारांनाच ९ हजार मानधन तत्त्वावर नियुक्त करणे उचित ठरेल.सेवानिवृत्त शिक्षकांपेक्षा डी.एड.बी.एड.धारक तरूण शिक्षक अधिक उत्साहाने अध्यापनाचे काम करतील.शिवाय २० हजार रूपये सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन देण्याऐवजी पात्रताधारक तरूण उमेदवारांनाच ९ हजार रूपये मानधन तत्त्वावर नेमले तर शासनाचा पैसाही वाचेल व सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही कमी होईल. म्हणून काढलेले परिपत्रक दुरुस्ती करून नियमित शिक्षक भरती होईपर्यंत बेरोजगार पात्रताधारक डीएड,बीएड युवक-युवतीची नियुक्ती करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जलिंदर पावरा,आकाश मोरे,तुळशीराम पावरा,रमेश सुळे आदि बिरसा फायटर्स पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!