मालपुरला दि. १० तारेखपासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पालखी सोहळ्याने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात

मालपुरला दि. १० तारेखपासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पालखी सोहळ्याने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर. शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाला १० जुलैपासून सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने रविवारी संपुर्ण गावातुन संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पालखीला सकाळी आठ वाजता संत सावता महाराज मंदिरापासून सुरुवात झाली तर दुपारी चार वाजेपर्यंत गावातील राजमार्गावर सुरू होता.
या कीर्तन सप्ताहात पहाटे चार वाजता गावातून प्रभातफेरी, त्यानंतर ५ ते ६ काकडा आरती. सकाळी ८ ते ११ व
दुपारी दोन ते चार श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन ६ ते ७ हरिपाठ आरती गीतापाठ, व दररोज रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरी कीर्तन होणार आहे.
तरी मालपुरसह परिसरातील भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत सावता केले आहे. महाराज भजनी मंडळ व प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवारी १० जुलै रोजी ह.भ.प. नाना महाराज दोंडाईचाकर, ११ रोजी ह.भ.प. गजानन महाराज चौगावकर, १२ रोजी ह.भ.प. मुरलीधर महाराज कढरेकर, १३ रोजी ह.भ.प. अतुल महाराज नारणेकर, १४ रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर, १५ रोजी संत नामदेव महाराज पण्यतिथी हभप रवींद्र महाराज
तारखेडकर, १६ रोजी रविवारी संत सावता महाराज पुण्यतिथी ह. भ. प. प्रकाश महाराज शिंदखेडाकर १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प प्रकाश महाराज यांचेच काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी
या संपुर्ण कार्यक्रमासाठी संत सावता भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, पातालेश्वर दत्त प्रासादिक भजनी मंडळ, रुहानी सत्संग मंडळ तसेच गावातील युवकांसहित ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या सप्ताहाला ह.भ.प. बापू महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या कार्यक्रमासाठी तन, मन, धनाने मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!