वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल
राजपूत यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023
शिरपूर – शिरपूर तालुक्यातील वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी शिवाजी राजपूत शिरपूर तालुक्यात नेहमीच नवनवीन शेती प्रयोग करून व वृक्षारोपण बाबत जनजागृती करून विविध उपक्रम राबवित असतात. या तालुक्यात त्यांनी बांबू शेतीचा अभिनव असा प्रयोग यशस्वी केला असून हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाच्या देखील संदेश दिला आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नवी दिल्ली या संस्थेने घेतले असून त्यांना मानाच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 साठी निवड करण्यात आली. यांनी त्यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क व इतर ठिकाणी एक जुलै 2022 पासून ते 30 एप्रिल 2023 पर्यंत सतत ,अखंडित विविध मान्यवरांच्या वाढदिवसाला बांबू रोप प्रमुख पाहुण्यांसोबत लावणे व आलेल्या प्रमुख व्यक्तींना मोफत रोप भेट देणे अशा कामाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त झाला. असे काम करणारा भारतात वृक्षमित्र शिवाजी राजपूत पहिलीच व्यक्ती ठरली.इंडिया बुक रेकॉर्ड मुळे भोरखेडा, शिरपूर व धुळे जिल्ह्याचे नाव दिल्लीत कोरले गेले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हा एक विक्रम आहे. असा विक्रम लाखो झाडे लावणारा वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी केला आहे.
रेकॉर्डची नोंद अशी –शिवाजी लोटन राजपूत यांनी 1920 व्यक्तींच्या वाढदिवसाला 265 बांबूचे रोप सतत 440 प्रमुख पाहुण्यांसोबत लावून, आलेल्या प्रमुख व्यक्तींना 1360 रोप मोफत भेट देऊन असा संगमनिय उपक्रम करून भारतामध्ये रेकॉर्ड ब्रेक करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळाला. सदरच्या पुरस्कारामुळे माझ्या उत्साहात द्विगणित झाला असेल मला अधिकची प्रेरणा मिळून मी यापुढे सतत पर्यावरण व वृक्षारोपण कार्यक्रम राबवित राहणार आहे असा विश्वास शिवाजी राजपूत यांनी व्यक्त केला आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यातून विविध सामाजिक राजकीय, औद्योगिक शैक्षणिक व शेती विषयक संघटना व व्यक्तिमत्व व समाज बांधव यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.