लायन्स क्लब ऑफ सावर्डेचा पद्ग्रहण सोहळा संपन्न. .!

*लायन्स क्लब ऑफ सावर्डेचा पद्ग्रहण सोहळा संपन्न. .!* चिपळूण (प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)लायन्स क्लब ऑफ सावर्डे नवीन कार्यकारणीचा शपथ विधी आणि पदग्रहण सोहळा कार्यक्रम सावर्डे येथील सेमिनार हॉल मध्ये संपन्न झाला .सदर कार्यक्रमांस PMJF ला.सुनील सुतार, ADV ला. विजय जमदग्नी, रिजन चेअरमन डॉ. ला.विजय रिळकर ,झोन चेअरमन ला.विजयकुमार रतवा ,सावर्डे तंटामुक्ती अध्य्क्ष प्रकाश चव्हाण , तसेच चिपळूण लायन्स क्लब ,गुहागर लायन्स क्लब ,गॅलॅक्सझी क्लब चिपळूण चे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मेलीन जोन्स यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष श्री.राजेश कोकाटे यांनी आपल्या वर्षभरातील केलेल्या कामांचा आढावा दिला.आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. PMJF ला.सुनील सुतार यांनी नूतन अध्यक्ष ला.डॉ.निलेश पाटील ,सचिव श्री.सतीश सावर्डेकर,खजिनदार ला.अरविंद भंडारी आणि इतर सदस्य यांना शपथ दिली.तसेच नवीन् सदस्य ला.डॉ.अजित गावकर यांना लायन्स क्लब मध्ये समाविष्ठ झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लायन्स क्लब च्या लेपल पिन चे आणि पावसाळ्यात घ्यावायची काळजी या पत्रकाचे अनावरण करण्यात आले.PFJM ला.सुनील सुतार यांनी उपस्थित सर्वांना लायन्स क्लबची माहिती दिली तसेच सामाजिक क्षेत्रातील लायन्स क्लब चे योगदान सांगून मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष ला.डॉ.निलेश पाटील यांनी लायन्स क्लब सावर्डे गेली 5 वर्ष सावर्डे परिसरात विविध माध्यमातून सामाजिक काम करत आहे.अजूनही शैक्षणिक आणि आरोग्य विषयक काम करायची असून आपल्या सर्वांच्या सहकार्य अपेक्षित आहे असे सांगितले. उपस्थित सर्वांचे आभार सचिव ला.सतीश सावर्डेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.श्री.अरविंद भंडारी,आणि ला.अदिती निकम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!