नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाकडून राज्यव्यापी आंदोलनास परवानगीसाठी निवेदन सादर.
शहादा (वार्ताहर /प्रतिनिधी) दि. १४/-
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकारांच्या विविध प्रकाराच्या समस्यांसंदर्भात शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भारतीय दंड विधान कलम 353 च्या दुरुपयोग करण्यात येतो व पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कलमाचा धाक दाखवून पत्रकारांना निर्भीडपणे पत्रकारिता करण्यापासून रोखले जाते. त्यामुळे 353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात ज्या काही पत्रकारांवर 353 सारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी मिळावी ,पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे, पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना करावी, तालुका व जिल्हास्तरीय विविध समित्यांवर पत्रकारांना प्राधान्याने नियुक्त करावे, अवैद्य व्यावसायिक, वाळूमाफिया व गाव गुंडांकडून पत्रकारांवर होणारे हल्ले व विनाकारण होणारा त्रास या संबंधित पोलीस ठाण्यांकडून वेळोवेळी संरक्षण मिळावे, याबरोबरच इतर अनेक मागण्यांचे निवेदन शहादा शहराचे तहसीलदार दिपक गिरासे सो. व प्रांताधिकारी सुभाष दळवी सो.यांना लेखी स्वरूपात महाराष्ट्र व केंद्र शासनाडे सदर निवेदन पाठविणे साठी देण्यात आले.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे शहादा तालुका का. सदस्य के. डी.गिरासे,यशवंत कलाल व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन आले.