वडाळी ता.शहादा….. येथे तब्बल ९फुटी अजगर आढळून आला!
त्या अजगराचा शेळीच्या पिल्लावर ताव मारण्याचा बेत असतांनाच शेळी चारणारे मुलांना तो आढळून आला त्यात प्रकार हा भयनावह होता शेळीच्या पिल्लाला अजगराने पकडणार आणि अजगर हा एक खोल खड्यात पडला त्या शेळी चारणारे मुलांच्या निरदर्शनात आला तोच जवळच शेतकरी सुनील माळी ह्यांना आवाज दिला आणि वरील शेतकरी ह्यांनी वडाळी पोलीस पाटील गजेंद्र गोसावी ह्यांना फोन केला असता पोलीस पाटील ह्यांनी सर्पमित्र उमेश कोळी,अर्जुन पानपाटील ह्यांना बोलवून घेतले त्यात खोल खड्यात दबा धरून बसलेल्या त्या नऊ फुटी अजगराला सर्पमित्र उमेश कोळी आणि अर्जुन पानपाटील ह्यांनी अथक परिश्रम घेत पकडला त्यावेळेस सर्व त्या वडाळी शेळीपाल आणि जवळील शेतकरी ह्यांचा निष्ठेचा स्वास सुटला आणि त्या अजगरास सर्पमित्र ह्यांचा प्रयत्नाने दूरवर सुरक्षित स्थळी सोडण्यात आला.