जल जीवन मिशन यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा
प.स.सभापती विरसिंग ठाकरे यांचे प्रतिपादन
नंदुरबार ( प्रतिनिधी =नरेश शिंदे )
शहादा समिती येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात लोक कल्याणकारी कार्यामध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच धर्तीवर जल जीवन मिशन यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अपेक्षित आहे , असे प्रतिपादन शाहादा पंचायत समिती सभापती मा. विरसिंग ठाकरे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत नवनिर्माण संस्थेच्या वतीने आयोजित क्षमता विकास प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
पंचायत समिती च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी मा. राघवेंद्र घोरपडे, विस्तार अधिकारी मनोज देव , आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अतिथीच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली . याप्रसंगी गट विकास अधिकारी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेत जल जीवन मिशन यशस्वी करण्यासाठी व सर्व कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले . कार्यक्रमाची प्रस्तावना नवनिर्माण संस्थचे अध्यक्ष रवि गोसावी यांनी केले .
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षक राजेश ईशी , सुरेश महाले सीमा वळवी प्रमोद वाणी यांनी जल जीवन मिशन , पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची जबाबदारी , स्रोत बळकटीकरण , पाणी शुध्दीकरण , पाणी ताळेबंद याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद वाणी , भूषण साळुंखे , मनीषा पाडवी , रीमा वसावे , दारासिंग वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले.