*छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेतून रुग्णांना मोफत झाडे वितरणास सुरुवात*
पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे साहेब व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून व पोपटराव रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेली छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक, क्रांतीनगर साजापूर- छत्रपती संभाजी नगर व डॉ.जीवन राजपूत सर व टीम यांचे जिल्हा न्यायालय समोरील जे जे प्लस हॉस्पिटल व न्यूरॉन इंटरनॅशनल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या हॉस्पिटल मधील प्रथम रुग्णास अर्जुन साताङा या आयुर्वेदिक वृक्षाचे रोप भेट देऊन एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रमात सुरुवात केली आहे व यामध्ये सातत्य ठेवून दररोज जेवढे रुग्ण डिस्चार्ज होतील त्यांना पर्यावरण पूरक देशी झाडे तसेच आयुर्वेदिक आणि दुर्मिळ प्रजातीची झाडे भेट म्हणून देण्यात येणार आहेत, हे महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल आहे जे रुग्णांना एक झाड म्हणून भेट देत आहे ,त्या रुग्णांनी परिवारासहित त्यांच्या परिसरामध्ये या झाडाची लागवड करून संवर्धन करणे हा संकल्प त्या माध्यमातून दररोज 200 ते 250 झाडे लागली जातील व संवर्धन होईल पाऊल पर्यावरण संवर्धनाकडे ,धन्यवाद जे जे प्लस हॉस्पिटल चे डॉक्टर जीवन राजपूत सर व संपूर्ण हॉस्पिटल मधील डॉक्टर साहेब, आर के सिंग सर व छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेतील सर्व युवा प्रतिनिधी,कार्यक्रमाला उपस्थित हरी कारभारी वाकळे, योगेश दापते, सचिन घायवत, दिनेश दापते, आकाश दापते, संदीप पाटील, संदीप वायाळ. उपस्थित होते.