जिल्हास्तरीय गुणगौरव सत्काराचा कार्यक्रम. वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नंदुरबार

जिल्हास्तरीय गुणगौरव सत्काराचा कार्यक्रम. वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नंदुरबार
जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सन 2021 – 22 व सन 2022 – 23 असे दोन वर्षाचे पास आऊट झालेले विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावी आणि ग्रॅज्युएशन डिग्री प्राप्तधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी व सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि पदोन्नती प्राप्त कर्मचारी, अधिकारी यांचा गुणगौरव व सत्कार सोहळाचा कार्यक्रम शहादा येथे पार पडला.

संत शिरोमणी सेवालाल महाराज आणि स्वा वसंतराव नाईक साहेब यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुवत करण्यात आली त्यात
शहादा तालुक्यातील भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था शाखा शहादा द्वारा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. शहादा तालुक्यातील टांड्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आले असून या ठिकाणी बंजारा समाजाचे समाज बांधवांचे प्रमुख पाहुणे म्हणून चेनसिंग राठोड, हिम्मत राठोड, ठानसिंग चव्हाण,राजेश राठोड,शिवाजी चव्हाण,हेमराज चव्हाण,रामसिंग चव्हाण, डॉ राम जाधव आणि (सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी संस्थांचे सरचिटणीस ) संचालक भैया साहेब संजय जाधव व (सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव)वर्षाताई संजय जाधव यांचे सत्कार करण्यात आले. व समाजाचे वेगवेगळे शिक्षण क्षेत्रातून चांगल्या मार्काने पास झालेले तरुण तरुणींचा सत्कार केले गेले. प्रमाणपत्र सह ट्रॉफी प्रधान करण्यात आली अजून समाजात जे कोणी चांगले पदवीत व सरकारी सेवा चांगल्या प्रकारे पार पाडले आणि सेवानृत झाले आश्यांचे देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सूत्रसंचालन श्री एस पवार यांनी केले. दहावी व बारावीत चांगले गुणाने पास होऊन पुडच्या शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेऊन आयुष्याची सुरुवात केली. त्यांची देखील कौतुक करण्यात आले आणि असच समाजाच्या नागरिकांना व तरुणांना समजा बद्दल गर्व व्हावा असे कार्य करत राहवे असे भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था च्या वतीने समाज बांधवांना आव्हान आणि शुभेच्छा आहे .
आभार प्रदर्शन जाधव पी एम
व कार्यक्रमासाठी श्री प्रमोद भाऊसाहेब आरडी राठोड सुधाकर नाईक राठोड वाय एस यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!