हिवाळी जि प शाळेला कोरीट शाळेची शैक्षणिक भेट …
नंदुरबार -:दिनांक 16 जुलै रविवार रोजी के. डी. गावित शैक्षणिक संकुल कोरीट शाळेची शैक्षणिक भेट जि. प. शाळा हिवाळी ता . त्र्यंबकेश्वर जि. नाशिक या उपक्रमशील शाळेस आयोजित करण्यात आली. संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित यांचा प्रेरणेतून के. डी. गावित प्राथ माध्य व उच्च माध्य विद्यालयाची ही शाळा भेट संस्थेचा सचिव ऋषिका गावित, प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी (माध्य), गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, केंद्रप्रमुख सुरेश वानखेडे व संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन आम्ही केले.
दिनांक 16 जुलै पहाटे कोरिट येथून निघाल्यानंतर दुपारी निसर्गाच्या सानिध्यात
डोंगराच्या कुशीत असलेल्या जि. प. शाळा हिवाळी येथे पोहोचले.. इमारत तशी पाहता साधारण होती, परंतु शाळेचे शैक्षणिक वातावरण अत्यंत आनंदाने भरलेले होते. सदर शाळेचे शिल्पकार उपक्रमशील शिक्षक केशव गावित यांची आम्ही भेट घेतली व त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती व प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्या विद्यार्थ्यांनी आम्हास करून दिली..
या शाळेतील विद्यार्थी तब्बल 12/15 पर्यंत पाढे तोंड पाठ, भारतीय संविधानातील सगळीच कलम अवगत असलेले, राष्ट्रीय व राज्य महामार्ग कोणते याची नावे सांगता येणारे, जगभरातील देशाच्या राजधान्या पुस्तक न पाहता सांगणारे, स्पर्धा परीक्षा देणारे हे विद्यार्थी.
पण सर्वच शैक्षणिक बाबतीत आपला अंदाज खोटा ठरविणारे काम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या हिवाळी शाळेत पाहण्यास मिळाले. कारण इथल्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना हे सगळं अगदी तोंडपाठ आहे.
शाळेतील पहिली पासुनचे सर्व विद्यार्थी यु ट्यूब वरून cursive writing,गणिती संबोध स्वतःच स्वयंअध्ययनातुन शिकतात. आम्ही जेव्हा शाळेत पोहोचलो तेव्हा संपूर्ण plastic कागदाचे आवरण असलेल्या या शाळेत अमेरीकेतुन एक शिक्षक विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणा बाबत ऑनलाईन शिकवत होते.
शाळेतील पहिली पासून चे सर्व विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी इंग्रजी व मराठीत लिहू शकतात.तसेच एक साडे तीन वर्षाची मुलगी भारतीय संविधानातील 50 कलम तोंडपाठ म्हणते व जागतिक पातळीवरील 150 सामान्य ज्ञानातील प्रश्नांची उत्तरे ती दोन्ही हातांनी पाढे लिहीतांना देते.
हिवाळी शाळेतील विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षभरातील 365 दिवस दररोज 12 तास शिक्षण देणारी ही राज्यातील सर्व शाळांसाठी प्रेरणादायी शाळा, आणि याचे श्रेय येथील उपक्रमशील शिक्षक केशव चंदर गावित सर. यांना जाते ..
अशाप्रकारे या शाळेसारखे गुणवत्तापूर्ण काम आपणही करू शकतो, असा ध्यास घेऊन आम्ही सर्व शिक्षक वृंद शैक्षणिक गुणवत्ता वाढीची प्रेरणा घेऊन निघालो अशी भावना कोरीट माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मुकेश पाटील यांनी व्यक्त केली ..