लाखापूर येथे वृक्ष दिंडीचे आयोजन
तळोदा तालुक्यातील लाखापुर (फॉ.) येथील माध्यमिक विद्यालयात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच सागर पवार ,माजी प स सदस्य दिलीप ठाकरे ,माजी सरपंच सरदार ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य अशोक ठाकरे ,पोलीस पाटील सुरेश नाईक, समाजसेविका गोमीबाई ठाकरे, जि प शाळेचे ज्येष्ठ शिक्षक येवले, ठाकूर , शाह , सुनील ठाकरे ग्रामस्थ मुख्याध्यापक योगेश पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील व प्रमुख मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन, वृक्ष दिंडीचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वारकरी सांप्रदाय वेशभूषेत विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या जयघोष करीत वृक्ष लागवडीचा अनमोल संदेश दिला . गावातून प्रभात फेरी काढत वृक्षारोपणाच्या जागर करण्यात आला विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा घोषणा देत वृक्षांचे महत्त्व पटवून दिले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद राणे तर कार्यक्रमाचे नियोजन सजावट फिरोजअली सैय्यद, सुवर्णा कोळी, मंगल पावरा यांनी केले
वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील संजय पाटील, सतीश पटेल, विनोद राणे ,मंगल पावरा, विलास पाडवी ,फिरोजअली सैय्यद, सुवर्णा कोळी ,अनिल भामरे, विजय पवार ,वना नाईक, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले