दोंडाईचा शहरात मोटार सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यांत आले आहे

दोंडाईचा शहरात मोटार सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यांत आले आहे
दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी
दोंडाईचा ता. शिंदखेडा. येथे दि.१५.०७.२०२३ रोजी फिर्यादी भूपेद्र कैलास महाजन रा बालखेडा ता शिदखेडा जि. धुळे हे त्याची मोटार सायकल क्रमांक MH १८-BT-८६३५ हिचे ने त्याचे नातेवाईक राहत असलेले राणफुल कॉलणी विठठल मंदिराजवळ दोंडाईचा येथे त्याच्या नातेवाईक यांच्या घरासमोर रात्री लावली होती. ती अज्ञात चोरटयाने चारी करुन नेली होती. म्हणुन दोंडाईचा पोलीस ठाणे येथे अज्ञात अरोपी बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दि.१७.०७.२०२३ रोजी दोंडाईचा शहरात नंदुरबार चौफुली येथे पोसई दिनेश मोरे, पोकों अनिल धनगर व चालक शिरसाठ असे नाकाबंदी करीत असताना एक मोटार सायकलवर दोन इसम दिसले त्याना थांबवले त्याच्याकडे मोटार सायकल क्रमांक MH १८-BW-१७०५ अशी मिळून आली त्याना इतक्या रात्री कुठे जात आहे या बाबत विचारणा केली असता त्यानी अडवा उडवी ची उत्तरे दिले त्याचे नाव गाव विचारले असता त्यात एक राजेंद्र नाना ठाकरे व एक बालक त्याच्या सोबत होता. गाडीचे कागदपत्र बाबत विचारना केली असता घरी असल्याचे सांगितले. त्याच्यावर संशय असल्याने त्याना पोलीस ठाणे येथे आणुन त्याची विचारपुस केली असता त्यानी ति मोटार सायकल चोरी करुन आणले बाबत सांगितले. तसेच त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०५ वेगवेगळया कंपनीचे एनरॉईड व साधे बटनवाले मोबाईल फोन मिळुन आले. व पोलीस कस्टडी दरम्याने आरोपी ने ०३ मोबाईल फोन व एक MH १८- BT- ८६३५ गुन्हा दाखल असलेली मोटार सायकल काढुन दिली. नमुद वरील आरोपी कडुन MH १८-BT-८६३५ MH १८-BW-१७०५ मोटार सायकल व ०८ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असे एकुण १,७६,०००/- चा मुददेमाल आरोपी कडुन हस्तगत करण्यात आला. एक विधीसंघर्ष बालक याच्यावर पुढील कारवाई करीत आहोत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोसई / दिनेश मोरे, पोहेकॉ प्रविण निंबाळे पोकों / पुरुषोत्तम पवार पोकों/ अनिल धनगर, पोकों कापुरे पोक हर्षद बागुल चालक पोकों / नरेंद्र शिरसाठ यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ प्रविण निंबाळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!