यावल येथे रविवारी आदिवासी कोळी समाज बांधवाची बैठक
मनवेल ता.यावल : जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे, ढोर, महादेव, मल्हार कोळी समाज बांधवांची ९ ऑगस्ट आदिवासी दिन साजरा करावयाचे असल्याने नियोजन निम्मत बैठकीचे आयोजन २३ जुलै रोज रविवारी सकाळी ११ वा. शेतकी संघ यावल येथे जि.प.गटनेते तथा समाजाचे नेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षस्थानी आयोजीत करण्यात आली आहे.
जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाज्याच्या सर्व संघटना पदाधिकारी, वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ मार्गदर्शक, महिला भगिनी व तरूण बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी कोळी समाज क्रांतिदिन समिती तर्फे, समाजाचे तालुक्यातील सर्व सरपंच, सर्व संघटनांतर्फे करण्यात येत आहे.