डॉ. व्यंकट मैलापूरे यांचा वाढदिवस छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकची स्थापना करून साजरा.
पर्यावरण प्रेमी पोपटराव रसाळ यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली, छत्रपती संभाजीराजे वृक्ष बँक, उपशाखा नंबर-1, ची स्थापना डॉ. व्यंकट मैलापुरे सर यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्याच शुभ हस्ते रामलीला मैदान बजाज नगर शहरामध्ये आज दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आली. या वृक्ष बँकेत पर्यावरण पूरक देशी झाडे तसेच आयुर्वेदिक आणि दुर्मिळ प्रजातीची रोपे तयार करून रोपे मोठी झाल्यानंतर ,दीड वर्षानंतर बजाज नगर परिसरातील नागरिकांना मोफत देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित मनोज कदम प्रसिद्ध उद्योजक, मनोज जैन लोकदूत, अमृत मराठे,एकनाथ पवार ,हरी कारभारी वाकळे ,योगेश दापते, प्रदीप दापते, डॉ.अर्चना राठोड, जय उपासे, प्रा.जयश्री पवार, डॉ एम.डि संगपाल, डॉ. आर के सिंग, भगवान सदावर्ते, प्रफुल्ल कांबळे , एकनाथ पवार, रमेश बिरादार, संतोष कोटकर, वसंत कपाटे, योगेश पाटील.सचिन घायवत ,मनीष देशमुख ,संतोष महाले, संदीप पाटील,एकनाथ पवार ,हरी कारभारी वाकळे ,योगेश दापते, प्रदीप दापते, सचिन घायवत ,मनीष देशमुख ,संतोष महाले,नितीन अंबोरे, दिनेश दापके, रामलीला मैदान परिसरातील सर्व महाराज मंडळी, तसेच बजाज नगर शहर ,छत्रपती संभाजीनगर शहर, वाळुज महानगर एक, क्रांतीनगर साजापूर, रांजणगाव ,वडगाव, करोडी, आदी परिसरातून शेकडो पर्यावरण प्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर व्यंकट मैलापुरे यांनी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अंभोरे सर यांनी केले. तर आभार योगेश दापते सर यांनी मानले. 🇮🇳🌳🌱🙏