पुलाअभावी मंदाणे-दुधखेडा येथील शेतकऱ्यांसह नागरिकांना मारावा लागतोय सहा किलोमीटरचा फेरा:मंदाकिनी नदीवर मोठ्या पुलाची मागणी

पुलाअभावी मंदाणे-दुधखेडा येथील शेतकऱ्यांसह नागरिकांना मारावा लागतोय सहा किलोमीटरचा फेरा:मंदाकिनी नदीवर मोठ्या पुलाची मागणी:आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्र्यांना निवेदन….. मंदाणे:शहादा तालुक्यातील मंदाणे येथील मंदाकिनी नदीवर दुधखेडा गावाकडे जाण्यासाठी मोठा पूल नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल होतं आहे.शेतात जाण्यासाठी व इतर जीवनावश्यक कामांना जाण्यासाठी सुमारे सहा ते सात किलो मीटर अंतराचा अधिकचा फेरा मारावा लागत असून या नदीवर पावसाळी अधिवेशनात तात्काळ पूल मंजूर करून पूलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्याबाबतचे निवेदन नुकतेच मंदाणे येथील पंचायत समिती सदस्यांसह शेतकऱ्यांकडून आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांना देण्यात आले.
सविस्तर माहिती की,मंदाणे(ता.शहादा)हे गांव मंदाकिनी नदीच्या संगमावर बसलेले आहे.नदीच्या उत्तरेस मंदाणे गाव असून दक्षिणेस दुधखेडा,मानमोडे,चिरखान,मलगाव,भुलाने,सटीपाणी आदी गांवे आहेत.मंदाणे हे मोठे बाजार पेठेचे गांव आहे.येथे बाजारासह वैद्यकीय,शैक्षणिक,बँकिंग सुविधा मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळत असल्याने वरील गावांतील व परिसरातील नागरिकांचा रोजच दैनंदिन संपर्क मंदाणे गावाशी येतो.परंतू पावसाळ्याच्या दिवसात तसेच बेमोसमी पावसामुळे दरवर्षी मंदाकिनी नदीस नेहमीच पाणी असते तर काही वेळा मोठा पुर असतो.त्यामुळे दक्षिणेकडील गावातील नागरीकांना,शेतकऱ्यांना मंदाणे येथे येण्यासाठी व मंदाणे येथील शेतकऱ्यांना दुधखेडाकडे शेतात जाण्यासाठी जवळपास असलोद मार्गे ६/७ कि.मी.अंतराचा जास्त फेरा करून यावे-जावे लागते.मंदाणे येथील शेतकऱ्यांची जमीन ही मंदाणे,दुधखेडा शिवारात येते तर दुधखेडा,मानमोडे येथील काही शेतकऱ्यांची जमीन ही मंदाणे व परिसरातील शिवारात येत असल्याने वरील गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी पूल नसल्याने असलोद मार्गाचाच वापर करावा लागतो.त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असतो.तसेच वाहतुकीसाठी वाहनाचा आर्थिक फटका बसत असून शेतीचे कामे देखील वेळेवर होत नाहीत.म्हणून वरील गावातील शेतकऱ्यांची मंदाकिनी नदीवर पुल होण्याबाबत आग्रही मागणी आहे.मंदाणे येथील नदीवर मोठा पुल झाल्यास मंदाणे व मध्यप्रदेशात खेतिया,पानसेमल येथील बाजार पेठेच्या गांवांना दुधखेडा,मानमोडया,मलगाव,भुलाने,सटीपाणी,चिरखान आदी गावातील शेतकऱ्यांना शेतीचा माल विक्रीसाठी व शेती उपयोगी वस्तू घेण्यासाठी सोयीचे होणार आहे.तसेच मंदाणे येथे शैक्षणिक दृष्ट्या चांगली सोय आहे.येथे विद्यार्थ्यांना ई.१२ वी पर्यंत आर्ट्स व सायन्स विभागाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध असून डी.एड,शेतकी,इंग्लिश मेडीयम चे शिक्षणाची देखील सोय आहे.परंतु पूल नसल्याने विध्यार्थ्यांना १८ ते २० कि.मी. अंतरावर जात शहादा येथे शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे.त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुदंड बसतो आहे.त्याचप्रमाणे वरील गावांमध्ये वैद्यकीय सोय नसल्याने रुग्णांना मंदाणे येथे मोठे अंतराचा फेरा मारून यावे लागते.एखाद्या रुग्णाची तब्बेत जास्त सिरीयस झाली तर काही वेळा उशिरा दवाखान्यात पोहचल्याने तो रुग्ण दगावन्याची शक्यता असते.एकंदरीत सर्व परिस्थिती पहाता हा पूल बांधला गेल्यास वरील गावातील शेतकऱ्यांना,नागरिकांना,रुग्णांना,विध्यार्थ्यांना,शासकीय कर्मचाऱ्यांना असलोद गावामार्गे मंदाणे येथे येण्यासाठी ६ ते ७ कि.मी.अंतर कमी होणार असून मोठी आर्थिक व वेळेची बचत होणार आहे.जर या नदीवर मोठा पूल बांधला गेला तर शेतकरी,सामान्य नागरिक,विध्यार्थी वर्ग व रुग्णांचे हाल थांबणार आहे.
**आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांकडून निवेदन:मंदाणे येथील मंदाकिनी नदीवर दुधखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा पूल या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून द्यावा,याबाबतचे मागणी निवेदन राज्याचे आदिवासी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांना नुकतेच देण्यात आले.निवेदनावर मंदाणे पंचायत समिती सदस्यांसह मंदाणे,दुधखेडा,मानमोडे येथील ग्रामस्थ,शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
*प्रतिक्रि सेया: १)मंदाणे येथील मंदाकिनी नदीवर पूर्वेला बरीच साठवण बंधारे बांधण्यात आली आहेत.त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वर्षातून ९/१० महिने टिकून राहते.त्यातच दरवर्षी महिन्यात,दोन महिन्यात होणाऱ्या बेमोसमी पावसामुळे नदीला येणाऱ्या अचानक पाण्यामुळे मंदाण्याहून दुधखेडाकडे जाण्याचा संपर्क कधीही तुटत असतो.तसेच गांव जवळ असल्यामुळे गावाचे सांड पाणी नदीत जाते.त्यामुळे ज्या ठिकाणी पायी चालणारे किंव्हा मोटर सायकलस्वार वापर करतात त्या खडकावर वर्षभर पाणी वाहत असते व शेवाळ तयार होते.शेवाळमुळे पायी चालणारे व मोटर सायकलस्वार घसरतात व त्यांच्या शरीराला मोठी इजा देखील होते.अश्या गंभीर समस्यांना नागरिकांना व शेतकऱ्यांना वर्षभर तोंड द्यावे लागत असल्यामुळे या नदीवर तात्काळ पुल मंजूर होऊन बांधकाम होणे गरजेचे आहे.

सौ.रोहिणी दिनेश पवार, शहादा पंचायत समिती सदस्या,मंदाणे गण ता.शहादा मंदाणे(ता.शहादा)-दुधखेडा रस्त्यावरील मंदाकिनी नदीवर पावसाळी अधिवेशनात अति महत्वाची बाब म्हणून तात्काळ पूल मंजूर करून मिळावा यासाठीचे निवेदन आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजय कुमार गावीत यांना निवेदन देतांना मंदाणे गणाचे पं.स.सदस्य प्रतिनिधी दिनेश पवार सह मंदाणे व परिसरातील शेतकरी,नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!