सद्या आपल्या जिल्हात बर्या पैकी प्रमाणात पाऊस झाला आहे व संत गतीने सुरुच आहे व पावसाळ्यातच सर्पदंश चे प्रमाण देखील वाढतात कारण पावसाचे पाणी हे बिळांमधे शिरल्या कारनाने साप हे बिळातुन बाहेर पडतात व पर्याय म्हणून ते अन्न व निवारा शोधन्या साठी ते मानवी वस्तीत शिरतात. व अपघात होतात असे अपघात होऊ नये म्हणून काय केले पाहिजे व जर अपघात झालाच चुकुन कोनाला सर्पदंश झालाच तर काय केले पाहिजे हे जानुन घेने खुप महत्वाचे आहे. सर्पदंशा पासुन वाचन्या साठी खालील मुद्दे लक्षात ठएवनए
1) रात्री झोपतांना खाली जमीनीवर झोपु नये पलंगावरच झोपावे
२) घराच्या जवळपास पालापाचोळा,कचर्याचे ढिग,विटांचे तुकडे,वाळलेल्या लाकडांचा साठा राहु देऊ नये
३) घराच्या जवळ कंपाऊड ला लागुन किंवा खिडक्याच्या जवऴपास असलेल्या झाडांच्या फांद्या छाटुन घेने
४) सरपन व गवर्या घरापासुन लांब व उंच जागेवर ठेवने व काढतांना सुरक्षेची काळजी घ्यावी
५) शेतात काम करतांना डायरेक्ट हात टाकु नये आगोदर काठीने ठोकुन खात्री करुन घ्यावी रात्रीचे फिरतांना पायात बुट घालावे
७) घराच्या परिसरात गवत वाढु देऊ नये
८) घराच्या जवळील तसेच घरातील बिळे निट बुजावीत व रात्री झोपतांना दरवाजा खिडक्यांच्या फटा कपड्याने पँक करुन घ्याव्यात
९) साप दिसल्यास त्याला पकडण्याचा वा मारण्याचा प्रयत्न करु नये जवळील सर्पमित्रांशी संपर्क करावा व सापावर सुरक्षित अंतरावरुन लक्ष ठेवावे
सर्पदंश झाल्यास काय करावे
सर्वप्रथम दंश झालेल्या व्यक्तीला जास्त घाबरवु नये त्याला धिर देने सर्वच साप विषारी नसतात आपल्या भागात फक्त ४ विषारी साप आढळतात विषारी साप चावल्यास आगोदर जखम स्वच्छ पाण्याने धुवावे हाताला चावल्यास दंडावर,पायाला चावल्यास मांडिला आवळपंट्टी बांधावी बांधतांना पेन किंवा बारीक काठी ठेऊन बांधावे. जास्त फिट बांधु नये तसेच घोणस किंवा फुरसे चावल्यास आवळपट्टी बांधु नये किंवा ब्लैडने कट चिरा मारु नये.मियची किंवा लिंबाचा पाला खायला देऊ नये कधी कधी सापाच्या विषाचे परिणाम हे उशिरा देखील जानवतात व सगळ्यात महत्वाचे साप चावलेल्या व्यक्तीस जास्त हालचाल करु देऊ नये त्याला. साप चावल्यास सरळ सरकारी हाँस्पिटल मधे जावे सांपांवरचे विषरोधक औषध हे फक्त दवाखाण्यातच उपलब्ध आहेत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊन कुठल्या मंदिरात किंवा बाबा बुवा याच्या कडे जाऊ नये शक्य होईल तितक्या लवकर जवळील सरकारी दवाखान्यात पोहचावे जितका उशिर कराल विषाचा प्रभाव तितकाच वाढेल. सर्पदंशावर प्रतिसर्पविष हे एकमेव औषध आहे जे तुम्हाला फक्त सरकारी दवाखान्यातच निशुल्क उपलब्ध होईल आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या मदत लागल्यास आम्ही आहोतच
आपलाच:- सर्पमित्र संजय वानखेडे
वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार
मो नं :- 8805707919